Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एसटी कर्मचाऱ्यांची आज शरद पवारांसोबत बैठक, परिवहन मंत्री सुद्धा बैठकीला उपस्थित राहणार

 एसटी कर्मचाऱ्यांची आज शरद पवारांसोबत बैठक, परिवहन मंत्री सुद्धा बैठकीला उपस्थित राहणार


मुंबई : एसटी महामंडळाचे विलीनीकरण करा या मागणीसाठी मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचारी राज्यातील विविध भागात आंदोलन करत संप पुकारला आहे. त्यामुळं राज्यातील प्रवाशांचे आतोनात हाल होताना पाहयला मिळत आहे. काही एसटी कर्मचारी कामावर हजर राहिले असले तरी, अजून सुद्धा मुंबईतील आझाद मैदान येथे एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. मागील दोन महिन्यात अनेक बैठका झाल्या. चर्चा झाल्या परंतु तोडगा काही निघाला नाही.

दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत एसटी कर्मचारी यांची बैठक होणार आहे, हि बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे होणार असून, विशेष म्हणजे या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब सुद्धा उपस्थित राहणार आहेत. एसटी कर्मचारी यांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे, तरी सुद्धा अजुनही काही कर्मचारी आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. काही कर्मचाऱ्यांना निलंबित सुद्धा करण्यात आले आहे,


या संपाचे काही काळ भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना भाजप फूस लावत आहे, असा आरोप भाजपवर करण्यात आला. पगारवाढ झाल्यानंतर काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, परंतू अनेक कर्मचारी आपली मागणीवर ठाम आहेत, जोपर्यंत विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत संप मागे नाही, अशी भूमिका या कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळं आजतरी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर तोडगा निघणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आजची बैठक सह्याद्री आतिथीगृह होणार असून, या बैठकील एसटी कर्मचारी, तसेच त्यांचे शिष्टमंडळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब आदी उपस्थित राहणार आहेत, त्यामुळं आजतरी संपावर तोडगा निघून काही मार्ग निघणार का? याकडे लक्ष लागले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.