Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एसटी कामगार संघटनेने सदावर्तेंची केली हकालपट्टी

 एसटी कामगार संघटनेने सदावर्तेंची केली हकालपट्टी


एसटी कर्मचार्‍यांच्या विलीनीकरणाची न्यायालयीन लढाई लढणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांची एसटी कामगार संघटनेने हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी आता ठाण्याचे वकील सतीश पेंडसे हे न्यायालयीन लढाई लढणार आहेत.

सोमवारी एसटी कामगार कृती समितीची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत कामगार कृती संघटनेने गुणरत्न सदावर्ते यांना हटवण्याची घोषणा केली.

एसटी विलीनीकरणासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आमच्यातर्फे आम्ही गुणरत्न सदावर्ते यांची नेमणूक केली होती. मात्र, आता आम्ही त्यांना पत्र देत त्यांची नेमणूक मागे घेतल्याचे सांगितले आहे. तसेच, आम्ही आता नव्या वकिलाची नेमणूक केलेली आहे. पुढील सुनावणीला नवीन वकील न्यायालयात हजर राहतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी दिली. तसेच, सदावर्ते यांची नेमणूक करून फार मोठी चूक झाली, अशी कबुली देखील गुजर यांनी दिली.

वकिलसाहेब स्वत: डिप्रेशनमध्ये

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यामुळे लोकांच्या डोक्यात भ्रम निर्माण झाला होता. वकीलसाहेब स्वत: डिप्रेशनमध्ये आहेत. ज्यांची नोकरी गेली आहे ती आता वाचणार आहे. एसटी टिकवण्याची जबाबदारी कर्मचार्‍यांची आहे, एसटी टिकेल तर आपण टिकू, असे कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनील निरभवणे म्हणाले.

माझ्याकडे 75 हजार कर्मचार्‍यांचे वकीलपत्र - सदावर्ते

एसटी कामगार संघटनांनी सदावर्ते यांना न्यायालयीन लढाईतून मुक्त केल्यानंतर सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली. माझ्याकडे 75 हजाराहून अधिक एसटी कर्मचार्‍यांचे वकीलपत्र आहे. मी 75 हजाराहून अधिक लोकांचा वकील आहे. ज्या युनियन होत्या त्या बाद झालेल्या, गुजरलेल्या युनियन होत्या. त्या युनियनकडे एक टक्काही कष्टकरी नाही आणि मान्यता रद्द झालेल्या आहेत, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.