महापालिकेचा 24 वा वर्धापन दिन साध्या पद्धतीने साजरा :
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा 24 वा वर्धापन दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते दीप्रज्वलन करीत वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
9 फेब्रुवारी 1998 साली सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेची स्थापना झाली. आज महानगरपालिकेला 24 वर्षे पूर्ण झाली. या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेकडून कोणतेही कार्यक्रम न आयोजित करता साध्या पद्धतीने वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते दीप्रज्वलन करीत आणि केक कापून करण्यात आले.
तसेच महापालिकेचा 24 व्या वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी उपमहापौर उमेश पाटील, स्थायी सभापती निरंजन आवटी, सभागृह नेते विनायक सिंहासने, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, समाजकल्याण सभापती सुबराव मद्रासी, अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त नितीन शिंदे, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखाधिकारी सुशील कुमार केम्बळे, लेखाधिकारी स्वप्नील हिरगुडे, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे आदी उपस्थित होते. कोव्हिडंची परिस्थिती आल्यामुळे यंदा महानगरपालिका प्रशासनाने इतर कोणतेही कार्यक्रम न घेता साध्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.