Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बप्पी लाहिरी यांचं निधन..

 बप्पी लाहिरी यांचं निधन..


मुंबई :  बॉलिऊडमध्ये डिस्को संगीताची जादू आणण्याचे श्रेय ज्यांच्या नावावर आहे असे संगीतकार आणी गायक बप्पी लाहिरी यांचे मुंबई येथे निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.

बप्पी लाहिरी हे मुंबईच्या सिटी केअर हॉस्पीटलमध्ये गेल्या महिनाभरापासून उपचार घेत होते. त्यांना ह्दयविकाराचा त्रास होता. त्यांना सोमवारी घरी सोडण्यात आले होते. परंतू मंगळवारी त्यांची तब्येत बिघडली. त्यांच्या कुटुंबियांनी डॉक्टरांना घरी बोलावले, परंतू डॉक्टरांनी प्रयत्न करूनही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. त्यांचे काल मध्यरात्री निधन झाले. ‘चलते चलते ‘डिस्को डान्सर ‘ ‘ शराबी ‘ या चित्रपटातील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी विशेष गाजली होती. 

बागी ३ चित्रपटात २०२० मध्ये त्यांनी त्यांचे अखेरचे गाणे संगीतबद्ध केले होते.जवळपास पाच दशके आपल्या संगीत आणि आवाजाने बॉलिवूडवर छाप सोडणारे ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आलोकेश लाहिरी असे बप्पी यांचे मूळ नाव होते. बाप्पी यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटमध्ये बप्पी लाहिरी यांनी अखेरचा श्वास घेतला. तम्मा तम्मा लोगे, डिस्को डान्सर, याद आ रहा है तेरा प्यार ही सुपर हिट गाणी बप्पी लाहरी यांनी गायली आहेत. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952  रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. तरुणाईला डिस्को डान्सवर थिरकायला लावणारे बप्पी लाहिरी हे  आपल्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध होते. आपल्या हटक्या शैलीनं त्यांनी बॉलीवूड आणि संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 1973 साली त्यांनी नन्हा शिकारी या चित्रपटापासून बॉलिवुडमधील करीअरला सुरुवात केली.

1973 मध्ये 'नन्हा शिकारी' या चित्रपटातून संगीतकार म्हणून पदार्पण केलेल्या बप्पी लाहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटक्या संगीताने छाप सोडली. ऐंशी-नव्वदीच्या दशकात त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना तरुणाईला वेड लावले होते. त्यांच्या संगीतातील ही जादू कायम होती. 'डर्टी पिक्चर' या चित्रपटात त्यांनी संगीतबद्ध आणि पार्श्वगायन केलेल्या 'उ लाला' हे गाणंही चांगलंच लोकप्रिय ठरलं. 2021 मध्ये बप्पी लहिरी यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतू त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.