त्या 15 अनधिकृत नळ कनेक्शन धारकावर फोजदारी दाखल करा: आयुक्त नितीन कापडणीस यांचे आदेश तर कर्तव्यात कसूर करणारा सिनिअर पाईप इन्स्पेक्टर निलंबित:
यापुढे अनधिकृत पाणी कनेक्शन दिसल्यास त्या भागाचा पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला जबाबदार धरले जाणार : आयुक्त कापडणीस यांचा इशारा
सांगली: सांगलीतील शिंदेमळा, कालानागर, बायपास रोड परिसरात सापडलेल्या 15 अनधिकृत नळ कनेक्शन धारकावर फोजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रशासनाला दिले आहेत तर कर्तव्यात कसूर करणारा त्या भागातील सिनिअर पाईप इन्स्पेक्टर मनराज साळुंखे यांना निलंबित करण्यात आले आहे.
तर यापुढे मनपाक्षेत्रात ज्या ठिकाणी अनधिकृत पाणी कनेक्शन दिसेल त्या भागाच्या मीटर रीडर आणि पाईप इन्स्पेक्टरला जबाबदार धरले जावे अशी सूचनाही आयुक्त कापडणीस यांनी प्रशासनाला केली आहे.
आयुक्त नितीन कापडणीस यांनी आज महापालिकेतील आपल्या दालनात पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. बैठकीस उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, पाणी पुरवठा अभियंता सुनील पाटील, पाणीपुरवठा अधीक्षक उज्वला शिंदे, आप्पा अलकुडे आदी उपस्थित होते. यावेळी महापालिका क्षेत्रातील पाणी कनेक्शनबाबतचा आढावा आयुक्त कापडणीस यांनी घेतला. तसेच मागील काही दिवसात मनपाकडे नोंद नसणारी अनेक बेकायदेशीर कनेक्शनची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली आहे याबाबतही कापडणीस यांनी कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत. ज्या भागात 15 कनेक्शन विनापरवाना आढळून आले आहेत त्या भागातील वरिष्ठ पाईप निरीक्षक मनराज साळुंखे यांना या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करण्याचे आदेश आयुक्त कापडणीस यांनी दिले तसेच ज्या 15 जणांनी विनापरवाना पाणी कनेक्शन वापरले त्या ग्राहकांवर सुद्धा फोजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही आयुक्त कापडणीस यांनी दिले.
यापुढे ज्या भागात अनधिकृत किंवा बोगस पाणी कनेक्शन आढळून येतील त्या ठिकाणी त्या भागाचा संबंधित पाणीपुरवठा कर्मचारी याला जबाबदार धरले जाईल असा इशाराही आयुक्त कापडणीस यांनी दिला. तसेच पाणीपुरवठा बिलाबाबत नागरिकांनी दक्ष राहावे आणि महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात किंवा ऑनलाईन साईट वर पाणी बिले भरून रीतसर पावती घ्यावी तसेच ज्यांच्या घरी पाणी कनेक्शन आहे मात्र त्यांना बिल येत नसेल असा ग्राहकांनी पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधून आपल्या बिलाबाबत चौकशी करावी. पाणी बिलापोटी कोणीही ग्राहकांनी कोणाशीही आर्थिक व्यवहार करू नये आणि अशी रक्कम कोण मागत असेल तात्काळ महापालिका पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
अनधिकृत नळ कनेक्शन आढळल्यास त्याच्या विरुद्ध पाणी चोरी व शासकीय मालमत्तेचे नुकसान प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल होणार. महानगरपालिकेने अनधिकृत नळ कनेक्शनची शोध मोहिम सुरु केलेली आहे. महानगरपालिकेने जर स्वत: नळ कनेक्शनचा शोध घेतला तर महानगरपालिका त्याच्या विरुद्ध पाणी चोरी व शासकीय मालमत्तेचे
नुकसान प्रकरणी
गुन्हा दाखल करणार आहे. या अनुषंगाने सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, ज्या नागरिकांकडे अनधिकृत नळ कनेक्शन्स असेल त्या नागरिकांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून दि. २३/०२/२०२२ पर्यंत स्वत:हून महानगरपालिकेकडे अर्ज सादर करावेत व योग्य शुल्काचा भरणा करुन आपले कनेक्शन अधिकृत करुन घ्यावे.
मनपाच्या सर्वेक्षणात दि. २३/०२/२०२२ नंतर अनधिकृत नळ कनेक्शन आढळल्यास त्याच्या विरुद्ध पाणी चोरी व शासकीय मालमत्तेचे नुकसान प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.