शेअर मार्केटींगच्या बोगस कंपनीद्वारे पैसे डबल करून देण्याच्या आमीषाला बळी पडलेल्या अन्यायग्रस्तांचे आवाज आरटीआय महासंघ उठविणार..
कॉलिटॉस ऍग्रो एक्झिम आणि ड्रीम मल्टीट्रक सर्व्हिसेस सारख्या बोगस कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून फसलेल्या अन्यायग्रस्तांनी आटीआय महासंघ संस्थेशी संपर्क साधनेचे आवाहन..
आपल्या महाराष्ट्र राज्यात मागील काही वर्षांपासून महापूराचे संकट तसेच कोरोनाने अख्ख्या देशात धुमाकूळ घालून आपल्या महाराष्ट्र राज्याला मोठीच आर्थिक मंदीची लाट स्थापित केली आहे. आणि त्याचा फटका अनेक उद्योगधंद्यासह व्यापारी, छोटे मोठे दुकानदार यांना बसला. आपले पारिवारिक स्वप्न जणू भंगच झाले, अशी मानसिक स्थिती आज अनेक नागरिकांच्या मनात भेडवसावू लागली आहे. आणि एखाद्या गिधाड थव्याप्रमाणे याचाच गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने लबाड़ लूबाडणूकांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. त्यात आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांसह सांगली जिल्हादेखील अपवाद ठरला नाही. या टोळ्यांच्या उद्भवलेल्या लाटेमध्ये सांगली जिल्हा देखील चौहोबाजूंनी सापडला आहे. गेले काही महिन्यांपासून अनेक माध्यमांच्या ठळक वृत्तांतून शेअरमार्केटच्या माध्यमातून पैसे डबल करून देतो.
अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या वृत्ताद्वारे अन्यायग्रस्तांची व्यथा स्थानिक पत्रकारांनी चोखपणे मांडली असल्याचे आणि संबंधीत आरोपींनी गोरगरिब जनतेला कोट्यावधी रूपयांचा गंडा घातल्याची माहिती आज आपल्याला रोजच वाचावयास मिळत आहेत. गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या लबाड लुबाडणूकांच्या टोळ्यांमध्ये प्रतिष्ठित व्यक्ती तसेच राजकीय वलय असणारे आरोपी असलेचे काही गुन्ह्यांमध्ये समोरदेखील आले आहे. आज राजरोसपणे धडधडीतपणे सर्व नियम कायदे धाब्यावर बसवून किंवा प्रशासनाच्या वरिष्ठ पदस्य असलेल्या काही प्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्यावर जणू त्यांचे दलाल आले आहे. आज अजुनही वरदहस्त असल्या सारखेच अर्थिभावात त्यांच्याकडून कॉलिटॉस अॅग्रो एक्झिम आणि ड्रीम मल्टीट्रेड सर्व्हिसेस सारख्या इतरही अनेक बोगस कंपन्यांची बेधडक जाहिराती करून अनेक नागरिकांना पैसे डबल करून देण्याचे आमिश दाखवून भोळ्या भाब जनतेला फसविण्याचा धंदा जोमाने आणि प्रशासन काही अंगी गांधारी मूनिकेच्या साँगाने पार पाडत आहे का? असे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे.
अमिषाला बळी पडलेल्या नागरिकांच्यातून प्रशासनाच्या या भूमिकेविरुद्ध संभ्रम निर्माण होत आहेत. अशा अमिषाला बळी पडलेल्या नागरीकांची तक्रार संबंधीत पोलीस ठाण्यामध्ये नाहक विविध त्रुटी काढून चोर सोडून संन्याशालाच त्रास देण्याचा प्रकार घडत असलेस अशा नागरिकांचा आवाज म्हणून त्यांची प्रज्ञानाच्या कार्यालयात होणारी दमछाक विरुद्ध आवाज उठवून तसेच त्यांना संस्थेच्या र सल्लागार तज्ञांच्या मदतीने कायदेशीर प्रक्रियेत मदत करून योग्य ते कायदेशीर मार्गदर्शनाने सक्षम करण्याची आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला शासन कायदेशीर दरबारी योग्यरित्या मांडणी करून त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता सहकार्य तसेच वेळ पड़ताच लोकशाही हक्काने तीव्रस्वरूपाचे लाक्षणिक उपोषणे संघटीतपणे कर्तव्यचुकाराविरोधात आणि लबाड लुबाहूकांच्या टोळ्यांच्या अवैध धनाढ्य ताकदीविरोधात लढा उभा करून सत्याग्रह पुकारून क्रांती स्थापित करण्याचा विडा अखिल भारतीय माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ता महासंघाने उपलला असून शेअर मार्केट ट्रेडींगच्या नावाखाली पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक झालेल्या अन्यायग्रस्तांनी निडरपणे संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन अखिल भारतीय माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. शौकत नायकवडी यांनी केले असून लवकरच सांगली जिल्ह्यातील शेअर मार्केट ट्रेडींगच्या नावाखाली फसवणूक झाल्याची अन्यायग्रस्तांची व्यथा सांगली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री. दिक्षीत गेडाम यांची भेट घेवून मांडणार असल्याची माहिती तसेच अशा संबंधीत लबाड लुबाडणूकांच्या टोळीमधील प्रतिष्ठीत व्यक्तीची माहिती देवून त्यांच्यावर तात्काळ स्वरूपात गुन्हे दाखल करण्याची लेखी निवेदन देखील सादर करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शौकत नायकवडी यांनी दिली आहे.
चौकट:- फॉलिटॉस ऍग्रो एक्झिम आणि ड्रीम मल्टीट्रेड सर्व्हिसेस सारख्या योगस कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून फसलेल्या अन्यायग्रस्तांनी तसेच शेअर मार्केट ट्रेडींगच्या नावाखाली पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक झालेल्या आणि संबंधीत पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करून घेण्यास टाळाटाळ होत असलेस अशा अन्यायग्रस्तांनी निडरपणे संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन अखिल भारतीय माहिती अधिकार व सामाजिक कार्येकर्ते महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. शौकत नायकवडी यांनी केले आहे. संपर्क १८२ अ, खामकर गल्ली, खणभाग, सांगली, मो. ७०२०६६७९७१ यावर संपर्क करावा.
आपल्या लोकप्रिय माध्यमातून वरील जनहितार्थ असणाऱ्या आवाहनात्मक बातमीस प्रसिद्धी देवून सहकार्य करावे, अशी विनम्र विनंती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.