शिष्यवृत्ती, फ्रीशिप, आरएसएमएस, निर्वाह भत्ता योजनेकरीता नवीन व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यास 31 मार्च पर्यंत मुदतवाढ - सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर
सांगली, दि. 3, : विजाभज विमाप्र व इमाव प्रवर्गातील नवीन शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी नवीन व नुतनीकरण अर्जदारांसाठी तसेच सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित नुतनीकरण अर्जदारांसाठी शिष्यवृत्ती/ फ्रीशिप/ RSMS/ निर्वाह भत्ता या योजनेकरीता अर्ज भरण्याकामी महाडिबीटीप्रणालीवर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नवीन व नुतनीकरणाचे अर्ज भरण्याबाबत अनुसचित जाती प्रवर्गाकरीता दि. 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता वर्ष 2021-22 मधील नवीन व नुतनीकरण अर्जदारांसाठी दि. 7 मार्च 2022 पर्यत अंतीम मुदतवाढ देण्यात आली देण्यात आली असून शिष्यवृत्ती/ फ्रीशिप/ RSMS/ निर्वाह भत्ता या योजनेकरीता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी www.mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावरुन अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित सर्व विद्यालय/ महाविद्यालयांनी वरील अंतीम दिनांकापर्यंत सर्व योजनांचे अर्ज भरुन घ्यावेत. भविष्यात अंतिम दिनांकानंतर मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्याबाबत किंवा अशा प्रकारे कोणतीही तक्रार निर्माण झाल्यास यास विद्यालय/ महाविद्यालयांना सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.