Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिका क्षेत्रातील अनअधिकृत पथविक्रेता यांनी तात्पुरते प्रमाणपत्र घ्यावे अन्यथा कारवाई : मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांचा इशारा

महापालिका क्षेत्रातील अनअधिकृत पथविक्रेता यांनी तात्पुरते प्रमाणपत्र घ्यावे अन्यथा कारवाई : मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांचा इशारा


सांगली : महापालिका क्षेत्रात अदयापही अनेक फेरीवाले महापालिकेकडे नोंदणी न करता अनअधिकृतपणे व्यवसाय करीत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे ज्या फेरीवाले यांचे सर्वेक्षण झालेले नाही तसेच ज्यांना सर्वेक्षण होऊनही अदयाप ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळालेले नाही अशा फेरीवाले यांना तीन महिने करीता महापालिकेडून तात्पुरते स्वरुपाचे फेरीवाला परवाना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. 

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत शहर फेरीवाला धोरण नुसार महापालिका क्षेत्रातील फेरीवाले यांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात आले आहे. आत्तापर्यंत २६१२ फेरीवाल्यांनी महापालिकेकडे कागदपत्रे जमा केली आहेत पैकी १२४६ फेरीवाले यांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आलेली आहेत. महापालिका क्षेत्रात अदयापही अनेक फेरीवाले महापालिकेकडे नोंदणी न करता अनअधिकृतपणे व्यवसाय करीत असल्याचे आढळून येत आहे.

तरी ज्या फेरीवाले यांचे सर्वेक्षण झालेले नाही तसेच ज्यांना सर्वेक्षण होऊनही अदयाप ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळालेले नाही अशा फेरीवाले यांना तीन महिने करीता महापालिकेडून तात्पुरते स्वरुपाचे फेरीवाला परवाना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून विशेष पथके तयार करणेत आलेली असून त्यांचे मार्फत महापालिका क्षेत्रात व्यवसाय करणारे फेरीवाला यांना ऑन दी स्पॉट व्यवसायाच्या ठिकाणावर परिरक्षण शुल्क व उपयोगिता शुल्क भरुन घेवून तात्पुरते प्रमाणपत्र दिनांक ०७/०३/२०२२ रोजी पासून देण्यात येणार आहे. तात्पुरते प्रमाणपत्र घेणारे फेरीवाला यांना तीन महिन्याच्या आत महापालिकेकडे सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन कायमस्वरुपी परवाना प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. 

अन्यथा त्यांना महापालिका क्षेत्रात कोठेही व्यवसाय करता येणार नाही व त्यांचे तात्काळ निष्कासन करण्यात येईल याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी असा इशारा महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.