'माफी मागतो, पुन्हा बदाम विकणार', असं का म्हणाला भुबन बद्याकर?
नुकतेच, त्याने एका वक्तव्यात म्हटले होते, की तो आता सुपरस्टार झाला आहे, त्यामुळे यापुढे बदाम नाही विकणार. मात्र, आता त्याने आपल्या वक्तव्यावर माफी मागितली असून, आपण पुन्हा बदाम विकणार असल्याचे म्हटले आहे. नुकताच भुबनचा अपघात झाला होता. त्याने एक कार घेतली होती, जी तो चालवायला शिकत होता. त्यानंतर त्याच्या कारला अपघात झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आता तो पूर्णपणे बरा झाला आहे. त्यांचे एक नवीन गाणेही येत आहे, या गाण्याचे रेकॉर्डिंग पश्चिम बंगालमधील बोलपूर येथील गोधुली स्टुडिओमध्ये झाले आहे. ज्यामध्ये तो त्याच्या अपघाताची कहाणी जगासमोर आणत आहे.
सौरव गांगुलींनीही केले होते आमंत्रित
भुवनला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या 'दादागिरी' या टेलिव्हिजन शोमध्येही आमंत्रित करण्यात आले होते. जिथे त्याचा सन्मानही करण्यात आला. नुकताच तो लोकांच्या निशाण्यावर आला होता, जेव्हा त्याने सांगितले, की तो आता सेलिब्रिटी झाला आहे, त्यामुळे तो बदाम विकणार नाही. या वक्तव्यावर त्याने आता माफी मागितली आहे. सेलिब्रेटींसोबत काय होते याची मला कल्पना नाही, असेही ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.