Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली येथे राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा 21 एप्रिलला

औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली येथे राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा 21 एप्रिलला


सांगली, ‍दि. 13  : राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली येथे दि. 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे. या मेळाव्यास स्थानिक तसेच इतर मोठ्या शहरातील कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण, एमएसबीव्हीइ उत्त्तीर्ण उमेदवारांनी मेळाव्यास स्वखर्चाने उपस्थित रहावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली चे प्राचार्य यांनी केले आहे.

मुलाखतीस येताना उमेदवारांनी आयटीआय पास गुणपत्रक छायांकित प्रत, आधार कार्ड छायांकित प्रत, आयटीआय प्रमाणपत्र छायांकित प्रत या कागदपत्रांच्या 2 प्रतिसह उपस्थित रहाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.