Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेतकऱ्यांना पीक विमा पाठशाळांना उपस्थित राहण्याचे आवाहन

 शेतकऱ्यांना पीक विमा पाठशाळांना उपस्थित राहण्याचे आवाहन


सांगली, ‍दि. 13 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी अधिक परिणामकारक होण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी पीक विमा पाठशाळांना उपस्थित राहून स्थानिक आपत्ती पीक विमा नुकसान भरपाई, काढणी पश्चात पीक विमा नुकसान भरपाई, तसेच हंगामाच्या प्रतिकुल परिस्थिती अंतर्गत पीक विमा नुकसान भरपाई याबाबत माहिती अवगत करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

केंद्र व राज्य शासनाने कृषि क्षेत्राचा पाया घट्ट करण्याकरिता शेतकऱ्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अनुषंगाने अधिक सुशिक्षित करण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पीक विमा पाठशाळा आयोजित करून सज्ञान करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात विविध ठिकाणी आत्तापर्यंत एकूण 42 पाठशाळा घेण्यात आल्या आहेत. पीक विमा पाठशाळा उपक्रमामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा योजनेंतर्गत येणाऱ्या समस्या व अडचणी सोडवणे, योजनेची उद्दिष्टे सफलपणे समजवणे इत्यादी बाबत कार्यवाही कृषि विभाग व रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत करण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या या उपक्रमामधून सुरक्षित व सक्षम शेतकरी तयार करण्याची कार्यवाही दि. 15 ऑगस्ट 2022 अखेर सुरू राहणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.