Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सभासद आणि सेवक ही कर्मवीर संस्थेची संपत्ती कर्मवीर पतसंस्थेच्या प्रत्येक सेवकाचे स्वतःचे घर हे आमचे स्वप्न सेवकांना घर बांधणीसाठी वार्षिक ३% व्याजदराने कर्ज चेअरमन :- श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील

सभासद आणि सेवक ही कर्मवीर संस्थेची संपत्ती कर्मवीर पतसंस्थेच्या प्रत्येक सेवकाचे स्वतःचे घर हे आमचे स्वप्न सेवकांना घर बांधणीसाठी वार्षिक ३% व्याजदराने कर्ज चेअरमन :- श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील


सांगली :- सभासदांचा विश्वास आणि प्रामाणिक सेवक ही कर्मवीर पतसंस्थेची संपत्ती आहे असा विश्वास कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी व्यक्त केले.

नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत सभासद आणि सेवक यांच्या हिताचे अनेक निर्णयांना संचालक मंडळाने एकमताने मान्यता दिली त्याबाबत माहिती देताना श्री. रावसाहेब पाटील बोलत होते.

सभासदांच्या आर्थिक उन्नतीचा विचार करून कर्जाचा व्याजदर एक टक्कयाने कमी केला आहे. त्यामुळे सभासदांची आर्थिक बचत होणार आहे. त्यातून सभासदांचे आर्थिक हित साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न संस्थेने केला आहे.

पतसंस्थामध्ये सेवकांना पगार कमी असतो या कल्पनेला कर्मवीर पतसंस्थेने छेद दिला आहे. कर्मवीर पतसंस्थेच्या सेवकांची नियमित कालावधीने पगार वाढ केली आहे. कर्मवीर पतसंस्थेच्या सेवकांचे वेतन हे कांही बँकेच्या वेतनाहून ही अधिक आहे. संस्थेच्या प्रगतीमध्ये सेवकांचे योगदान महत्वाचे आहे. याचा विचार करून संस्थेच्या सेवकांचे स्वतःचे हक्काचे घर देणार ही भावना संचालक मंडळाने अनेक वेळा बोलून दाखविली होती. त्यावर नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत शिक्का मोर्तब झाले.

त्यानुसार सेवकाना घर बांधणीसाठी वार्षिक ३ टक्के इतक्या अल्प व्याजदराने कर्ज देण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सहकारात कमी व्याज दरात सेवकांना घर बांधणीसाठी कर्ज देणारी कर्मवीर पतसंस्था ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था ठरणार आहे. यासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही विशेष प्रयत्न केले.

यावेळी संस्थेच्या व्हाईस चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, संचालक अॅड. एस. पी. मगदूम, डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, डॉ. रमेश वसंतराव ढबू, लालासो भाऊसो थोटे, अ. के. चौगुले (नाना), वसंतराव नवले, संचालिका सौ. ललिता सकळे तज्ञ संचालक डॉ. एस. बी. पाटील (मोटके), मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम उपस्थित होते. या निर्णयाचे सर्व सेवकांनी पेढे वाटून व संचालक मंडळाचे आभार मानून आनंद व्यक्त केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.