Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अनिल देशमुखांना 29 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

 अनिल देशमुखांना 29 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी


राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल देशमुख यांची सीबीआय कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी सीबीआयने केली होती.

मात्र, मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने ही मागणी फेटाळली. न्यायालयाने देशमुख यांच्यासह सचिन वाझे आणि इतर दोघांना 29 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हा निर्णय सीबीआयसाठी धक्का देणारा आहे.

मनी लॉन्ड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अनिल देशमुख आणि त्यांचे दोन साथीदार संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केली होती. तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तर अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणात सचिन वाझे न्यायालयीन कोठडीत होते. या चारही आरोपींना या महिन्याच्या सुरुवातीला सीबीआय कोठडीत ठेवण्यात आले होते. शनिवारी त्यांची सीबीआय कोठडीची मुदत संपली. त्यामुळे त्यांना विशेष सीबीआय न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांच्यासमोर हजर करण्यात आले.

यावेळी देशमुख यांना आणखी तीन दिवसांची सीबीआय कोठडी मिळावी, अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली. अनिल देशमुख तपासात सहकार्य करत नसून ते विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. त्यामुळे त्यांची आणि इतर आरोपींची कोठडी वाढवून द्यावी, असा युक्तीवाद सीबीआयने केला होता. मात्र, सीबीआय कोठडी आवश्यक नसल्याचे आढळून आल्यानंतर न्यायाधीशांनी चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.