सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्ट्रीट लाईट (विद्युत) विभागातील कर्मचारी सचिन माळदकर यांचे दु:खद निधन झाले.
यामुळे महानगरपालिकेतील कर्मचारी यांचा पुन्हा एकदा सुरक्षा व जिविताचा प्रश्न निर्माण झालेला आहे. महानगरपालिकेच्या स्ट्रीट लाईट (विद्युत) विभागातील कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून शहराला प्रकाश देण्यासाठी तारेवरची कसरत करत असतात. सचिन माळदकर हे प्रामाणिक व होतकरु कर्मचारी म्हणून त्यांचा नावलौकीक निर्माण झाला होता. अहोरात्र ते कामासाठी तत्पर असत.त्यांचे निधनाने त्यांच्या कुटंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तरी
मा.आयुक्त यांनी कर्मचारी यांच्यावर वरचेवर असे जिवावर बेतणारे प्रसंग लक्षात घेऊन अशा गंभीर घटनेस जबाबदार असणारे अधिकारी यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी तसेच कर्मचारी यांच्या सुरक्षाच्या दृष्टिकोनातून उपाययोजना आखाव्यात. विद्युत विभागातील आपले कर्तव्य पार पाडताना मृत्यूमुखी पडलेले सचिन माळदकर यांच्या कुटुंबीयाना 50 लाखाची आर्थिक मदत द्यावी व त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला महानगरपालिकेत कायमस्वरूपाची नोकरी द्यावी,त्यांच्या कुटुंबीयाना आधार द्यावा तसेच अश्या घटना न घडण्यासाठी योग्य त्या सुरक्षा साधने उपलब्ध करून द्यावीत.
सचिन माळदकर यांना
भावपूर्ण श्रध्दांजली
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
