जयश्री जाधव यांच्या विजयाचा सांगलीत काँग्रेसतर्फे जल्लोष कोल्हापूरकरांनी स्वाभिमानी बाणा दाखवला - पृथ्वीराज पाटील
सांगली, दि. १६ : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव या प्रचंड मतांनी निवडून आल्या. काँग्रेसचे नेते, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या कल्पक नेतृत्वामुळे त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून हा विजय संपादन केला. त्याबद्दल कॉंग्रेस भवन, सांगली येथे कॉंग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजयोत्सव साजरा करण्यात आला.
श्रीमती जाधव या विजयी होताच कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून तसेच साखर वाटून जल्लोष केला. यावेळी बोलताना श्री. पृथ्वीराज पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती जाधव कोल्हापूरच्या पाहिल्या महिला आमदार म्हणून निवडून देऊन कोल्हापूरच्या जनतेने राजर्षी शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या स्वाभिमानाचा बाणा दाखवून दिला आहे. एकजूट दाखवून जातीयवादी प्रवृत्तींना धडा शिकवल्याबद्दल महाआघाडीचे नेते आणि कोल्हापूरच्या जनतेचे अभिनंदन.
यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते संजय मेंढे, नगरसेवक मयूर पाटील, तौफिक शिकलगार, सनी धोतरे, विजय आवळे, नामदेव चव्हाण, अजित ढोले, शीतल सदलगे, मालन मोहिते, सुवर्णा पाटील, अशोक सिंग राजपूत, देशभूषण पाटील, रहीम हाटीवाले, सचिन घेवारे, टिपू बारगीर, माणिक कोलप, तोहीद फकीर, योगेश जाधव, शमशोद्दीन गोधळ, बाबगोंडा पाटील, परशुराम कोळी, राजेंद्र कांबळे, मौला वंटमूरे, संजय कुलकर्णी, उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

.jpeg)