Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत 61 लाखाच्या निधीचे वाटप महापौरांच्याहस्ते बचत गटांना निधीचे वाटप

प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत 61 लाखाच्या निधीचे वाटप महापौरांच्याहस्ते बचत गटांना निधीचे वाटप


सांगली:  प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत महापालिका क्षेत्रातील बचत गटातील महिलाना प्रधानमंत्री अन्नउद्योगासाठी 15 लाख व इतर व्यवसाय करता 46 लाख अशा एकूण 61 लाखाच्या निधीचे वाटप महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांहस्ते बचत गटांना करण्यात आले. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.

     केंद्र शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत बीजभांडवल योजननेची कार्यशाळा घेण्यात आली. सदर योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया करणाऱ्या महिला यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना यांच्या मार्फत चाळीस हजार रुपये मिळणार आहेत. त्या अनुषंगाने शासनस्तरावरून निधीही प्राप्त झाला आहे. सदर निधीचे नुकतेच महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी गटनेते विनायक सिंहासने, नगरसेविका अप्सरा वायदंडे , उपायुक्त चंद्रकांत आडके, सर्व बँकेचे मॅनेजर व सर्व एनयुएलएम स्टाफ उपस्थित होता. यावेळी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना एकूण पंधरा लाख रुपये निधीचे वाटप करण्यात आले व कॅनरा बँकमार्फत उद्योगासाठी 46 लाख वाटप करण्यात आले. सदर कार्यशाळेला व्यवस्थापक मतीन अमीन यांनी मार्गदर्शन केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.