इस्लामपूर प्रकरणात अजितदादा लक्ष घालणार? दोषींवर कठोर कारवाईची जोरदार मागणी, हरकाम्या स.दु.नि. मोकाटच
सांगली: इस्लामपूर येथील गोवा बनावट दारू प्रकरणातील संशयित पलायन प्रकरणात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार लक्ष घालणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. दरम्यान या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. दरम्यान ठराविक अधिकाऱ्यांचा हरकाम्या असणाऱ्या सदुनिला अजूनही क्लीन चीट दिल्याचेच दिसत आहे. सांगलीतील अधिकारीही त्या सदुनिला वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याची चचार्ही एक्साईजच्या वतुर्ळात रंगली आहे.
गोव्याहून दारू आणणारा कंटेनर येलूरजवळ रविवारी पकडण्यात आला होता. त्यावेळी एक्साईजच्या इस्लामपूर येथील पथकाने शंकर पवार, लक्ष्मण भोसले यांना ताब्यात घेतले होते. मात्र सोमवारी सकाळी पवार याने प्रातःविधीचा बहाणा करून पलायन केले होते. या घटनेने राज्यातील एक्साईजच्या वतुर्ळात चांगलीच खळबळ उडाली होती. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते. दरम्यान यातील दोषींना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे सांगलीतील वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असणाऱ्या सदुनिला यातून वाचवण्यात आले आहे.
यातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत असतानाच उपमुख्यमंत्री तसेच एक्साईजचे मंत्री अजितदादा पवार यांनी याची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे समजते. अधिकारात नसतानाही यातील संशयितांना एक्साईजच्या इस्लामपूर येथील पथकाने स्वतःच्या ताब्यात कसे ठेवले असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
वरीष्ठांची शाबासकी मिळवण्यासाठी येलूरमधील एका बार चालकाला हाताशी धरून कारवाईचा फासर् करणारा तो सदुनि चांगलाच चचेर्त आहे. त्याचे वडीलही एक्साईजमध्ये अधिकारी पदावर काम करत असल्यानेच त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचीही एक्साईजमध्ये चचार् रंगली आहे. त्यामुळे या सदुनिवर कारवाई होते का याकडे एक्साईजसह नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

