सांगली जिल्ह्यातील काही तलाठी, मंडळ अधिकारी, प्रांत ही कारवाईच्या रडारवर....
पुणे / सांगली :- स्थावर संपदा तथा मालमत्ता (विकास आणि नियमन) कायदा (रेरा) आणि तुकडेबंदी कायद्यांमधून पळवाट काढण्यासाठी पर्यायी कागदपत्रे देऊन शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
दस्त नोंदणी करताना ग्रामपंचायतींकडून देण्यात येणाऱ्या कर आकारणी दाखल्याचा (आठ-ड) आधार घेतल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या निदर्शनास आले आहे. हे दाखले तलाठी आणि प्रांत यांनी दिले असल्याने बेकायदा दस्त नोंदणी प्रकरणात हे अधिकारी डा आले आहेत.
162 बनावट एनए प्रकरणांची माहिती मागवली
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक तीनमध्ये दस्त नोंदणीसाठी वापरण्यात आलेले अकृषिक परवाने (एनए) बनावट असल्याची 162 प्रकरणे आढळून आली आहेत. या प्रकरणांची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मागवण्यात आली आहे. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यातील गैर तपशील जिल्हा प्रशासनाला देण्यात येणार असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.
सांगली जिल्ह्यातील काही तलाठी, मंडळ अधिकारी, प्रांत ही कारवाईच्या रडारवर
सांगली जिल्ह्यातही काही ठिकाणी बोगस प्रकरणे झाली आहेत. ह्यात तलाठी, मंडळ अधिकारी यांचा सहभाग असल्याने त्यांच्यावर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एका मंडळ अधिकाऱ्याच्या बातम्या प्रसारित केल्यामुळे काही जणाकडून पत्रकारावर हल्ला करण्यात आला होता. जखमी पत्रकाराने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याच बरोबर महसूल आयुक्त, पुणे यांना पत्रव्यवहार केल्याने पुण्यासहित इतर जिल्ह्यातही कारवाईचा धडाका सुरू आहे. संबंधित पत्रकाराने याचिका दाखल केल्याचे ही विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे. मुद्रांक नोंदणी विभागातील काहीजणांना नोटीस मिळाली आहे. त्यामुळे आता सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
