Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीरामध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

 उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीरामध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

सांगली दि. 19 : हॉकी, ॲथलेटीक्स, व्हॉलीबॉल जलतरण, योगा व मल्लखांब या खेळाचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर सन 2022-23 चे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली तथा जिल्हा क्रीडा परिषद सांगली यांच्यावतीने दि.23 एप्रिल 2022 ते दि. 02 मे 2022 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, सांगली-मिरज रोड, सांगली येथे करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये सहभागी  होण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाो क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी केले आहे.    

हॉकी, ॲथलेटीक्स, व्हॉलीबॉल, जलतरण, योगा व मल्लखांब या खेळाचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीरासाठी सहभागी वयोगट 8 ते 20 वर्षाखालील मुले व मुली असून प्रशिक्षण शिबीराची वेळ सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत आहे. प्रशिक्षण शिबीर नोंदणी दि. 20 ते 22 एप्रिल पर्यंत आहे. प्रशिक्षण शिबीराकरिता क्रीडा गणवेश व अल्पोपहारचा खर्च स्वत: करावयाचा आहे. या शिबीरामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली “साई फिटनेस सेंटर, नविन इमारत, मालु हायस्कूल समोर, गुलमोहर कॉलनी, दक्षिण शिवाजी नगर, सांगली” येथे क्रीडा मार्गदर्शक आरती हळींगळी व सीमा पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. वाघमारे यांनी केले आहे.    


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.