Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आटपाडीत 25 एप्रिलला बांबू मिशन कार्यशाळा

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  आटपाडीत 25 एप्रिलला बांबू मिशन कार्यशाळा 


सांगली दि. 19  : जिल्हास्तरीय बांबू लागवड व बांबू मिशन कार्यशाळा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 25 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता जवळे मल्टीपर्पज हॉल आटपाडी येथे होणार आहे.

या कार्यक्रमास माजी आमदार सदाशिव पाटील, भारत पाटील व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ यांची उपस्थिती असणार आहे. तर या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी विलास काळे हे रोजगार हमी योजना, उपवनसंरक्षक विजय माने राष्ट्रीय बांबू मिशन, सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक अजित भोसले बांबू मिशन व बांबूचे व्यापारी महत्व, कैलास नागे बांबू पासून पॅलेट्स निर्मिती या विषयावर तसेच जॉली बोर्ड लि. व्यवस्थापक गणेश शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच  कोल्हापूर जिल्ह्यातील यशस्वी शेतकरी अरविंद कल्याणकर व विनोद पाटील हे मनोगत व्यक्त करणार आहेत. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.