वीज विकतही मिळेना, थोडी झळ सहन करा, गुजरातचे उदाहरण देत नितीन राऊत यांचे वीज प्रश्नावरही राजकारण
मुंबई : गुजरातमध्येही भारनियमन (लोडशेडींग) सुरू आहे, असे सांगत वीजेच्या प्रश्नावर उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राजकारण सुरू केले आहे. भारनियमनाचे समर्थन करताना त्यांनी हे म्हटले आहे. विकत घेण्यासाठीही वीज उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत व्होल्टेज मेंटेन करणेही त्रासदायक होत आहे. सध्या थोड्या प्रमाणात लोडशेडिंग सुरू झाले आहे. परंतु यासंदर्भात अजूनही पूर्ण निर्णय झालेला नाही. नागरिकांना थोडी झळ सहन करावी लागेल. सध्या कोळशाचा दीड ते दोन दिवसांचा साठा आहे. आंध्र प्रदेश, गुजरातसह इतर राज्यात लोडशेडिंग सुरू आहे. आपल्याकडेही ते आवश्यक आहे, ते करावे लागेल, असे राऊत म्हणाले.
डॉ. राऊत म्हणाले की, प्रकल्पात पाणीसाठा कमी आहे. जलसंपदा विभागाबरोबर चर्चा करून १० टीएमसी पाणी घेतले. सात टीएमसी पाणी शिल्लक होते. कोयना येथे दिवसाला एक टीएमसी पाणी लागते. आता १७ दिवसांचे पाणी आहे. आता केवळ तीन दिवसांचे पाणी मिळेल. त्यामुळे हायड्रोपॉवरचा विषय संपला आहे. आता थर्मलमधूनच वीज मिळू शकते.
राज्यात सुमारे अडीच ते तीन हजार मेगावॉट विजेची तूट आहे. ती भरून काढण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील वीजवाहिन्यांवर भारनियमन करावे लागणार आहे.राज्यात सध्या २८,००० मेगावॉटपेक्षा अधिक विजेची विक्रमी मागणी कायम आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉपोर्रेशनकडून गेल्या २८ मार्चपासून १५ जूनपर्यंत दररोज ६७३ मेगावॉट विजेचा पुरवठा सुरू झाला आहे तसेच राज्य सरकारने कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडकडून (सीजीपीएल) ७६०
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
