Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली येथे संपन्न झालेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या कार्यकारी मंडळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

 सांगली येथे संपन्न झालेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या कार्यकारी मंडळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय



डावीकडून शशिकांत राजोबा, रवींद्र देवमोरे, सहखजिनदार पा.पा. यांनी, खजिनदार संजय शेटे, चेअरमन् जी. पाटील,  अध्यक्ष रावसाहेब आ. पाटील, केन्द्रीय उपाध्यक्ष भालचंद्र यांनी, व्हा. चेअरमन् दत्ता डोर्ले,  मुख्यमंत्री डॉ. अजित पाटील


दक्षिण भारत जैन सभेची अधिवेशनपूर्व 15 वी कार्यकारी मंडळाची बैठक सांगली येथे सभेचे अध्यक्ष श्री. रावसाहेब आ. पाटील (दादा) यांच्या अध्यक्षतेखाली सभा कार्यालयात संपन्न झाली. अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमी संपन्न झालेल्या या बैठकीमध्ये डॉ. अजित पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले. चेअरमन श्री. रावसाहेब जि.पाटील यांनी कार्यअहवाल सादर केला. अधिवेशनाच्या एकूण रूपरेषा व खर्चाविषयी आढावा घेतला.  गावोगावी संपर्क दौरे, वाहनांची उपलब्धता, रॅलीसंबंधी माहिती दिली.

शंभराव्या अधिवेशनामध्ये देणार्‍या विविध पुरस्कारांची घोषणा केंद्रीय उपाध्यक्ष श्री. भालचंद्र पाटील यांनी जाहीर केली. यामध्ये कर्मवीर भा. पाटील पुरस्कार माजी खासदार कल्लाप्पाण्णा बाबूराव आवाडे (दादा) तर  जीवनगौरव पुरस्कार (मरणोत्तर) श्री. बापूसाहेब बोरगावे (मामा) यांच्यासह एकूण 21 पुरस्कारांची घोषणा  त्यांनी केली. डॉ. अजित पाटील यांनी तीन दिवसीय अधिवेशनाच्या कार्यक्रमाबद्दल माहिती देवून शाखांच्या अधिवेशनाबाबत विश्‍लेषण केले. खजिनदार संजय शेटे यांनी सभा व शाखांच्या जमा खर्चाबद्दल माहिती दिली.

या बैठकीत अधिवेशनानिमित्त रौप्यमुद्रेचे लोकार्पण करण्यात आले. रौप्यमुद्रा समितीचे प्रमुख श्री. रविंद्र देवमारे यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. 1100/- रु. ही मुद्रा उपलब्ध होणार असून प्रत्येकांनी शंभराव्या अधिवेशनाचे चिरंतन स्मृती म्हणून जतन करून ठेवावी असे आवाहन केले. यासाठी सर्व शाखांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मागणी नोंदवली.

सभेचे अध्यक्ष श्री. रावसाहेब आ. पाटील (दादा) यांनी एकूण बैठकीचा घोषवारा घेत महत्वपूर्ण निर्णयामध्ये  

*जमखंडी येथे नविन विभाग सुरू करण्याचा निर्णय. 

* कोल्हापूर मधील लक्ष्मीपुरी येथील सभेची जैन श्राविकाश्रमाचे नव्याने बांधकाम होणार. 

* सांगलीत सभेसाठी तीन एकर जागेत अद्ययावत सर्वसोयीनियुक्त सांस्कृतिक भवन, सर्व शाखांचे ऑफिस, त्यागी निवास तसेच गेस्टरूम बांधण्याचा संकल्प जाहीर केले.  सभेचे हे अधिवेशन न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी सर्वांनी तन,मन, धनाने सक्रिय सहयोग देवून 15 मे रोजी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्यासाठी दादांनी आवाहन केले. सहखजिनदार श्री पा.पा. पाटील यांनी आभार मानले. बैठकीस दक्षिण भारत जैन सभेचे विभागीय पदाधिकारी शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.