Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंजाबमध्ये पोलीसच बनले हैवान, बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला निर्वस्त्र करून गुप्तांगाला दिले विजेचे शॉक

पंजाबमध्ये पोलीसच बनले हैवान, बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला निर्वस्त्र करून गुप्तांगाला दिले विजेचे शॉक


चंदीगड : पंजाबमध्ये पोलीसच हैवान बनले आहेत. एका बलात्कार पीडित महिलेने बलात्काराची तक्रार मागे घ्यावी यासाठी पोलीस ठाण्यात तिला निर्वस्त्र करून गुप्तांगाला वीजेचे शॉक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.पीडिताने म्हटले की, सीआयए स्टाफ-१ च्या बरखास्त एएसआयविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी अरनीवाला पोलिसांनी माझ्यावर दबाब आणला होता.

त्याला नकार दिल्यावर माझा छळ केला गेला. पोलीस ठाण्यावर गेल्यावर पोलीस ठाण्याच्या प्रमुखाने तडजोडीसाठी दबाव आणला.आरोपीच्या कुटुंबाकडून २०-२५ लाख रुपये मिळवून देण्याचे आशसन दिले. मी ते नाकारल्यावर मला ड्रगचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. मला निर्वस्त्र करून गुप्तांगाला करंटही दिले गेले. त्याचा व्हिडीओही बनवला गेला. कोऱ्या कागदांवर सह्या करून घेतल्या व त्यांना हवे तसे म्हणणे लिहून घेतले गेले.

अरनीवाला पोलीस ठाण्यात बरखास्त एएसआयविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करणारी पीडिता आणि साक्षीदाराला अवैधरीत्या ताब्यात ठेवून त्यांचा छळ केल्याच्या आरोपावरून ठाण्याचा अधिकारी मनजीत सिंग याला निलंबित करण्यात आले. याचबरोबर फिरोजपूरच्या एसएसपीने पीडितेला निर्वस्त्र करून गुप्तांगाला करंट लावल्याच्या आरोपाच्या चौकशीचेही आदेश दिले गेले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.