'त्यांचा चेहरा कोंबडीच्या....' जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना जशास तसे उत्तर
जळगाव, 12 एप्रिल : 'माझा चेहरा नागा सारखा आहे असे त्यांनी नकल करून दाखवल आहे. पण त्यांच्या चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागा सारखा आहे हे राज ठाकरे यांनी आरशात तपासून घ्यावे' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जशास तसे उत्तर दिले.
राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तरसभा घेऊन राष्ट्रवादीवर जोरदार प्रहार केला होता. राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही आपल्या शैलीत समाचार घेतली. 'राज ठाकरे हे उत्तम नकलाकार आहेत. इथं स्टॅडअॅप कॉमेडियनच्या जागा खूप खाली आहेत.
त्यांनी उपयोग करावा. माझा चेहरा नागाच्या फणा सारखा आहे, असे त्यांनी नकल करून दाखवलं आहे. माझा चेहरा नागा सारखा आहे त्याचा मला अभिमान आहे पण त्यांच्या चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागा सारखा आहे हे राज ठाकरे यांनी आरशात तपासून घ्यावे, असा सणसणीत टोला आव्हाडांनी राज ठाकरेंना लगावला. (फायनली 'या' व्यक्तीमुळे दीपिका परतली घरी, कार्तिकने मानले आभार!) 'यांनी कधीही बहुजन समाजाचा इतिहास वाचला नाही.
यांनी नेहमी पुरंदरेंचा इतिहास वाचला. ज्या बाबासाहेब पुरंदरेंनी जेम्स लेनला माहिती देऊन आमच्या जिजाऊ यांची बदनामी केली, ते यांचे आदर्श आहेत. बाबासाहेब मृत आहेत. त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे, त्यांच्याबद्दल आता बोलण योग्य नाही.
पण, हे काय वाचताय तेही तपासलं पाहिजे, असंही आव्हाड म्हणाले. काय म्हणाले होते राज ठाकरे? 'काय पण म्हणा, नागाने फना काढावा ना असा त्यांचा चेहरा, उद्या परत काही तरी बोललो तर, डसतो वगैरे की काय असं वाटतं, मनसे संपलेला पक्ष म्हणे, ये शेपटी पकडून फेकून देतो. वस्तरा सापडला तर राजकारण सोडून देईल म्हणाले. आता तिथे वस्तारा कसा सापडणार, दाढी कुणी करतच नाही.
मग वस्तारा कसा सापडणार. आव्हाडांच्या बुद्धीची कीव येते, असा सणसणीत टोला राज ठाकरेंनी लगावला. (सलीम शेख छातीठोकपणे म्हणाले, 'माझा नेता कधीही मुसलमानांच्या विरोधात नव्हता') '24 ऑगस्ट 2001 रोजी मुंब्रा परिसरात सिमीच्या 6 दहशतवाद्यांना अटक केली. मुंब्य्रातून संसदेवरील अबू हजमाला हल्ल्यातील आरोपीला अटक केली.
चार दहशतवाद्यांना मुंब्य्रातून अटक केली आहे. गुजरातमध्ये चकमकीत ठार झालेली इशरज जहाँ शेख ती इथंच राहत होती. मुज्जमील शेख हा दहशतवादी इथंच राहत होता. मुलुंड बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला मुंब्र्यातूनच अटक केली. जिथून आव्हाड निवडून येतो त्या मुंब्र्यात अनेक वेळा अतिरेकी सापडले. देशावर प्रामाणिक प्रेम करणारा मुसलमान यात भरडला जातो. धर्माचा अतिरेक करणाऱ्या मुसलमानांमुळे प्रामाणिक मुसलमान भरडले जातात' अशी यादीच वाचून दाखवत आव्हाडांची पोलखोल केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
