Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आरबीआयकडून आणखी चार बँकांवर कारवाई, राज्यातील तीन बँकांचा समावेश

 आरबीआयकडून आणखी चार बँकांवर कारवाई, राज्यातील तीन बँकांचा समावेश


भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आणखी चार सहकारी बँकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

या बँकांना एकूण चार लाखांचा दंड थोटावण्यात आला आहे. या प्रकारची कारवाई रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अनेकदा बँकांवर केली जाते. बँकांच्या कारभारावर आरबीआयची करडी नजर असते. आरबीआयने घालून दिलेले नियम आणि सूचनांचे एखाद्या बँकेने उल्लंघन केल्यास त्या बँकेवर आरबीआय दंडात्मक कारवाई करते. प्रकरण गंभीर असेल तर प्रसंगी त्या बँकेचा परवाना देखील रद्द होतो. रिझर्व्ह बँकेने एक प्रेस नोट रिलीज करत या बँकांवर करण्यात आलेल्या कारवाईसंदर्भांत माहिती दिली.

महाराष्ट्रातील तीन बँका

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ज्या बँकांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यातील तीन बँका या महाराष्ट्रातील आहे. यामध्ये अंदरसुल शहरी को-ऑपरेटिव्ह बँक, अहमदनगर जिल्ह्यातील महेश अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक, नांदेडमधाील मर्चेंट को – ऑपरेटिव्ह बँक आणि शहडोल स्थित जिल्हा सहकारी केंद्रीय बँक यांचा समावेश आहे. यातील अंदरसुल शहरी को-ऑपरेटिव्ह बँकेला दीड लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तर अहमदनगर जिल्ह्यातील महेश अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक आणि शहडोल स्थित जिल्हा सहकारी केंद्रीय बँक यांना प्रत्येकी एक लाखांचा आणि नांदेडमधील मर्चेंट को – ऑपरेटिव्ह बँकेला पन्नास हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याने संबंधित बँकांवर ही कारवाई करण्यात आली असून, याचा ग्राहकांच्या व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे आरबीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

अ‍ॅक्सिस आईडीबीआयवर कारवाई

काही दिवसांपूर्वीच आरबीआयकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अ‍ॅक्सिस बँकेवर कारवाई करण्यात आली होती. अ‍ॅक्सिस बँकेला तब्बल 93 लाखांचा दंड ठोठवण्यात आला होता. अ‍ॅक्सिस सोबतच याच प्रकरणात आईडीबीआय बँकेवर देखील कारवाई करण्यात आली, या बँकेला आरबीआयकडून 90 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयकडून अशा प्रकारची कारवाई करण्यात येते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.