शरद पवार नास्तिक, त्यांचा मंदिरातला फोटो बघितलाय का? राज ठाकरेंची टिका
गुढीपाडव्या मेळाव्याला केलेल्या भाषणामुळे मनसेप्रमुख राज ठाकरेंवर विरोधक आणि सर्वसामान्य नागरिकांनी सडकून टिका केली होती. या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी काल राज ठाकरेंनी ठाण्यात उत्तरसभा घेतली.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. "पवार स्वत: नास्तिक आहेत. त्यामुळे धर्माकडे बघताना ते नास्तिकतेनं बघतात. ते धर्म, देव वगैरे काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात" अशी टिका राज ठाकरेंनी केलीय.
तसेच, शरद पवार भूमिका मांडताना म्हणतात की, "हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. मात्र त्याआधी आमचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, असे पवार कधीही म्हणतांना दिसणार नाही. छत्रपतींचं नाव घेतलं आणि मुस्लिमांची मतं गेली तर काय करायचं? म्हणून ते छत्रपतींचं नाव घेत नाहीत. तसेच त्यांचा कधी मंदिरातील फोटो बघितला का" असा देखील सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, राज ठाकरेंच्या या भाषणानंतर अनेक नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील राज ठाकरेंवर निशाणा साधला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
