क्रेडाईकडून महानगरपालिका शाळांसाठी ५ लक्ष रूपये किंमतीचे १० संगणक संच भेट
क्रेडाईकडून महानगरपालिका शाळांसाठी ५ लक्ष रूपये किंमतीचे १० संगणक संच भेट : मनपा शाळेत अत्याधुनिक संगणक कक्ष तयार होणार: अन्य स्वयंसेवी संस्थां / व्यक्तींनीही मदतीसाठी पुढे यावे: आयुक्त नितीन कापडणीस यांचे आवाहन
सांगली: क्रेडाई महाराष्ट्र आणि क्रेडाई सांगली यांनी आज महानगरपालिका शाळांसाठी ५ लक्ष रूपये किंमतीचे १० संगणक संच भेट दिले. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे हे सर्व साहित्य सुपूर्त करण्यात आले
क्रेडाईकडून देण्यात आलेले 10 संगणक संच मनपाच्या एका शाळेला संगणक कक्ष तयार करण्यासाठी दिले जाणार आहेत. यावेळी महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष सुनील पुरडे, उपाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, सांगली जिल्हाध्यक्ष रवींद्र खिलारे, उपाध्यक्ष सुनील कोकीतकर , उत्तम आरगे, किशोर पटवर्धन, सचिव जयराज सगरे, दिलीप पाटील, दवल शहा, आनंदराव माळी आणि इमरान मुल्ला यांच्यासह क्रेडाईचे पदाधिकारी उपस्थित होते. क्रेडाईने दिलेल्या या संगणक संचातुन मनपाच्या एका शाळेमध्ये एक अत्याधुनिक संगणक कक्ष तयार केला जाणार आहे. क्रेडाई संस्थेच्या या योगदानाबद्दल महापालिका प्रशासनाच्यावतीने आयुक्त नितीन कापडणीस यांनी क्रेडाईच्या सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत तसेच अन्य स्वयंसेवी संस्थां / व्यक्तींनीही मनपा शाळांचा गुणवत्ता दर्जा उंचावण्यासाठी पुढे यावे असे विनंती वजा आवाहनही आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
