सेवानिवृत्त पोलिसांना देय लाभ तातडीने द्यावेत
तेव्हा अशा कर्मचाऱ्याचे संदर्भात संघटनेच्या वतीने आपणास विनंती करण्यात येते की, त्यांचे संदर्भात संदर्भाकीत शासन निर्णयाद्वारे त्यांना देय ठरत असलेले लाभ लवकरात लवकर मंजुर करण्यात यावेत तसेच त्यानुसार देय असणाऱ्या पुरवणी वेतन व भत्याचे फरकाची रक्कम अदा करण्यात यावी, त्याच प्रमाणे त्यांचे सुधारीत दराने निवृत्ती वेतन व इतर लाभ मंजूर करण्याबाबतचे प्रस्ताय महालेखाकार मुंबई यांचेकडे लवकरात लवकर पाठवून ते मंजूर करून घेण्यात त्यावेत की, जेणेकरून संबंधीताना सुधारीत दराने लाम (निवृत्तीवेतन, उपदान, राकरण क्याम वगैरे) लवकरात लवकर मिळू शकतील अशी कृपया तम विनंती आहे.
त्याचप्रमाणे अशीही विनंती करण्यात येते की, ज्या सेवानिवृत्त / मयत झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त / मयत होवून एक वर्ष / त्यापेक्षा जादा कालावधी होवून गेला आहे. तथापि वेतन पडताळणी पथकाकडून त्यांची वेतन निश्चितीची पडताळणी झाली नसल्याने त्यांचे निवृत्ती वेतन मंजुरीचे प्रस्ताव अद्यापपर्यंत आपले कार्यालयाकडून महालेखाकार कार्यालयाकडे सादर करता आलेले नाहीत. अशा -प्रकरणात वेतन पडताळणी पथकाकडून वेतननिश्चिती संदर्भात नोंदविण्यात आलेल्या आक्षेपाची पूर्तता आपले कार्यालयीन पातळीवरून प्रथम प्राधान्याने करण्याची कार्यवाही करण्यात यावी व त्यानुसार परिणामकारक पूर्तता करण्यात येवून निवृत्ती वेतन मंजूरीचे प्रस्ताव महालेखाकार कार्यालयास सादर करून त्यांची मंजूरी प्राप्त करून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी अशीही कृपया विनंती आहे. कळावे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.