जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव सप्ताहाची सुरुवात बुधवारपासून
सांगली : दरवर्षीप्रमाणे चालू वर्षी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समिती सांगली आणि श्री मुरघाराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव सप्ताहाची सुरुवात बुधवार, दि. २७ एप्रिल पासून सुरू होत असून त्याची सांगता अक्षयतृतीया दिवशी म्हणजेच मंगळवार, दि. ३ मे रोजी होणार असल्याची माहिती श्री मुरघाराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंग सांगलीचे अध्यक्ष सुधीर सिंहासने आणि महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रदीप दडगे यांनी सांगितले आहे.
यावेळी बोलताना सिंहासने आणि दडगे म्हणाले, महान शिवोपासक वीरशैव सांप्रदायक भक्तीभंडारी, भक्तीसाधक, जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती श्री मुरघाराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंग , उत्तर शिवाजीनगर सांगली येथे होणार असून यामध्ये बसवतत्त्व व वचन पारायण, रुद्रपठण, बसव व्याख्यानमाला, रुद्राभिषेक, वरदशंकर महापूजा, भजन, महात्मा बसवेश्वर जन्मकाळ, मिरवणूक, महाप्रसाद, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
बुधवार, दि. २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता प्रा. राजा माळगे ( वाळवा ) यांचे मज हृदयी सद्गुरु यावर व्याख्यान होणार आहे. गुरुवार, दि. २८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. राजेंद्र कुंभार ( कोल्हापूर ) यांचे संस्कृती आणि राजकारण यावर व्याख्यान देणार आहे. शुक्रवार, दि. १९ एप्रिल रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत श्री अक्कमहादेवी वीरशैव महिला भजनी मंडळ सांगली यांचे रुद्र पठणचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी ६ वाजता प्रा. डॉ. प्रिती शिंदे ( वारणानगर ) यांचे जगी सर्व सुखी असा कोण आहे यावर व्याख्यान आहे. शनिवार दिनांक ३० एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता डी. एस. कुंभार ( तहसीलदार, मिरज ) यांचे आजचा तरुण, स्पर्धा परीक्षा आणि आव्हाने यावर व्याख्यान होणार आहे.
रविवार दि. १ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत डॉ. सोमनाथ खेराडकर व डॉ. अमोल कोरे यांच्या सहकार्याने जनरल चेकअप तसेच आरोग्य शिबिर तर एम. एस. आय. ब्लड बँक सांगली-मिरज यांच्या सहकाऱ्याने रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे. सकाळी ११ वाजता राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा संपन्न होणार आहे. दरम्यान, सायंकाळी ७ वाजता यश आंबोळे ( कोल्हापूर ) यांचे अक्कमहादेवी एक मुक्त स्री यावर व्याख्यान होणार आहे. सोमवार दिनांक 2 मे रोजी सायंकाळी सहा वाजता इंजि. किरण कोरे ( लातूर ) यांचे महात्मा बसवण्णा व आपण यावर व्याख्यान देणार आहेत.
अक्षयतृतीया मंगळवार, दि. ३ मे रोजी सकाळी ६ ते ७ सनई चौघडा वादन,, ७ ते ९ पारायण समाप्ती, ९ ते १० रुद्राभिषेक, १० ते ११ वरदशंकर महापूजा, ११ ते १२ भजन, दुपारी १२ वाजता जन्मकाळ व सुंठवडा प्रसाद असा कार्यक्रम असून सायंकाळी ६ वाजता रमेश दडगे यांचा स्वरानंद हा मराठी भावगीत-भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ वाजता मिरवणूक आणि त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे. दरम्यान बुधवार, दिनांक २७ एप्रिल पासून मंगळवार दि. ३ मे अखेर दररोज सकाळी ७ ते ८ या वेळेत बसवतत्व वचन पारायण संपन्न होणार आहे.
यावेळी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव सप्ताह समितीचे निळकंठ कोरे, महादेव केदार, श्रद्धा हडदरे, मंगला सिंहासने आणि मुरघाराजेंद्र वीरशैव लिंगायात बोर्डिंगचे दीपक खोकले, सुनील कोरे, जयवंत मोतुगडे, अशोक पाटील, शंकरराव घुळी, रमेश दडगे, उदय सांभारे, सुशील हडदरे, विनायक शेटे, सुनील कबाडगे, सुरेश घेवारे, गौतम खुजट, सविता आरळी, सुरेंद्र चौगुले आणि व्यवस्थापक सतीश मगदूम उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.