Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"चंद्रकांत पाटलांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रातच राहावे कारण.", संजय राऊतांचा टोला

"चंद्रकांत पाटलांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रातच राहावे कारण.", संजय राऊतांचा टोला


मुंबई: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. त्यात महाविकास आघाडी सरकारने बाजी मारली. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हिमालयात कधी जाणार या चर्चांना उधान आले.

कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीमध्ये पराभूत झाल्यास हिमालयात जाणार, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा काँगेसच्या जयश्री जाधव यांनी जिंकली आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली. तेथे त्यांच्या पत्नीच महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. ९७ हजार ३३२ मते मिळवून त्या विजयी झाल्या. या मतदारसंघात भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांना मिळालेली ७८ हजार २५ मते दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत. भारतीय जनता पक्षाने ही जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यांचे प्रांताध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या होम ग्राऊंडवर ही पोटनिवडणूक होती. या पोटनिवडणुकीत स्वतः चंद्रकांत पाटील उतरतील व कुस्ती खेळतील असा कयास होता. ''कोल्हापुरात एखादी पोटनिवडणूक झाली तर मी ती लढवीन व जिंकून येईन'' असे आव्हान पाटलांनी दिले होते, पण प्रत्यक्ष पोटनिवडणूक लागताच ते गायब झाले. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांनी या निवडणुकीत पराभव झाला तर राजकारण सोडून आपण हिमालयात जाऊ अशीही घोषणा केली होती. त्यांना ही संधी कोल्हापूर उत्तरच्या निवडणूक निकालाने दिली होती. ती त्यांनी साधायला हवी होती, पण आता पाटील यांनी त्यावरून पलटी मारली आहे आणि सारवासारव केली आहे. अर्थात चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रातच राहावे. कारण ते येथे राहतील तोपर्यंत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विजयी होत राहील. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.