वकील सदावर्ते यांच्या कोठडीतील मुक्काम वाढला, पुरीलाही घेतले ताब्यात
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्तेना 11 दिवसांची पोलीस कोठडी द्या, अशी मागणी पोलिसांनी केली होती.
एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला केला. या कर्मचाऱ्यांना चिथावणी दिल्यामुळे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली. सुनावणीच्या वेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मोठमोठे खुलासे केले आहेत. या प्रकरणी ४ नवीन लोकांना अटक केली आहे तर एकाच शोध सुरु आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास घेण्यासाठी सदावर्ते यांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी काल रविवारी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या निवासस्थानाची झडती घेतली. त्यात नेमके काय सापडले याची माहिती मिळू शकलेली नाही. आंदोलन करणारे निदर्शक खरोखरच एसटीचे कर्मचारी होते की आणखी कोणी बाहेरचे लोक त्यात सहभागी झाले होते याची माहिती पोलिसांनी घेतली आहे.
सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सदावर्तेंची पोलीस कोठडी संपली होती यामुळे त्यांना किला कोर्टात पुन्हा हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान पोलिसांनी सदावर्ते यांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. सदावर्ते यांच्याविरोधात काही पुरावे असून अजून चौकशी करायची असल्याची मागणी केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
