डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब (सविता) आंबेडकरांच्या लग्नाची गोष्ट
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी रमाबाईंचं 1935 साली निधन झालं. त्यानंतर 14 वर्षांनी बाबासाहेबांनी दुसरं लग्न केलं. या दुसऱ्या लग्नाबाबत आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीबाबत फारशी माहिती अनेकांना नसते. बाबासाहेबांच्या या लग्नाची गोष्ट सांगताना, सुरुवात माईसाहेब (शारदा कबीर उर्फ सविता) आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या भेटीपासूनच करू.
बाबासाहेब आणि माईसाहेबांची पहिली भेट मुंबईतल्या पार्ल्यात डॉ. एस. राव नावाचे म्हैसुरियन गृहस्थ राहत. परदेशातून शिक्षण घेऊन परतलेले डॉ. राव हे अर्थतज्ज्ञ होते.
बाबासाहेबांची या डॉ. रावांशी 1942 पासून घनिष्ठ मैत्री होती. बाबासाहेब मुंबईत आले की, ते वेळ काढून डॉ. रावांच्या घरी जात असत. अगदी व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूर मंत्री असतानाही बाबासाहेब जेव्हा मुंबईत येत तेव्हा डॉ. रावांच्या घरी जात असत. दोघांमध्ये तासन् तास बौद्धिक चर्चा घडत असे.माईसाहेबही (तेव्हाच्या शारदा कबीर) डॉ. राव यांना ओळखत होत्या. डॉ. राव यांच्या मुली माईसाहेबांच्या मैत्रिणी होत्या. कारण कबीर कुटुंबाचा राव कुटुंबीयांशी चागंला परिचय होता. त्यामुळे त्यांचे एकमेकांकडे येणे-जाणे होत असे. बाबासाहेब आणि माईसाहेबांची पहिली भेट झाली, तिला डॉ. एस. राव हेच निमित्त ठरले ते असे.
माईसाहेब म्हणजे पूर्वीच्या शारदा कबीर.
शारदा कबीर या कृष्णराव विनायकराव कबीर आणि जानकीबाई कबीर या मूळच्या रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील दाम्पत्याच्या पोटची मुलगी. सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील शारदा यांचा जन्म 27 जानेवारी 1912 रोजी झाला. घरात शारदा मिळून एकूण आठ भावंडं.
लग्नानंतर 'शारदा कबीर'च्या 'सविता आंबेडकर' झाल्या. मात्र, बाबासाहेबांसाठी त्या कायम 'शरू'च राहिल्या, तर अनुयायांसाठी 'माईसाहेब' बनल्या. पण हे सारं बाबासाहेबांसोबत लग्नानंतर.
त्याआधी माईसाहेब राजकीय घडामोडींपासून कोसो दूर राहत आपलं वैद्यकीय शिक्षण आणि नंतर वैद्यकीय सेवेत गुंतलेल्या माईसाहेबांना बाबासाहेबांबद्दल 'ते मजूर मंत्री आहेत' एवढीच माहिती होती.अशातच 1947 सालच्या सुरुवातीला बाबासाहेब दिल्लीतून मुंबईत आल्यानंतर पार्ल्याला डॉ. राव यांच्या घरी गेले होते. तिथं माईसाहेब होत्या. त्यावेळी डॉ. एस. राव यांनी बाबासाहेबांना माईसाहेबांची ओळख करून देताना म्हटलं की, "ही आमच्या मुलींची मैत्रीण. अत्यंत हुशार आहे. एमबीबीएसचं शिक्षण घेतलंय. डॉ. मालवणकरांसारख्या विख्यात डॉक्टरांकडे ज्युनियर डॉक्टर म्हणून काम करते."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

