पुणे जिल्ह्यात नातवाने केला चुलत आजीवर बलात्कार...
पुणेः पुणे जिल्ह्यातील टाकळी भीमा (ता. Shirur) येथे एका नातवानेच त्याच्या चुलत आजीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन टाकळी भीमा (ता. शिरूर) येथील पीडित महिला व आरोपी नात्याने आजी व नाती आहेत. सदर महिला ही घरात असताना तिचा नातू असलेला आरोपी हा सदर महिलेला मला घरातील फळीवर डबा काढून द्या, असे म्हणून आजीला घरात बोलावले.
या वेळी घरात कोणी नसताना त्याने आजीला जबरदस्ती करत आजी वर बलात्कार केला. यावेळी सदर महिला आरडाओरडा करू लागली असताना 'तू काही बोलू नको गप्प बस नाहीतर तुझ्या मुलाला मारून टाकील' अशी धमकी दिली. मात्र, महिलेचा आवाज ऐकल्याने सदर महिलेची मुलगी त्या ठिकाणी आली. त्यामुळे आरोपी हा तेथून पळून गेला. मात्र त्यानंतर देखील तो दररोज आजीकडे रागाने पाहू लागला. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत सदर महिलेने तिच्या नातेवाईकांशी चर्चा करत शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली.येथे नातवावर गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपी असलेल्या नातवावर गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे व पोलिस नाईक सागर कोंढाळकर हे करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
