Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेंतर्गत शेवगा लागवडीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेंतर्गत  शेवगा लागवडीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन


सांगली, ‍दि. 12 : राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी/ पशुपालकांना वैरणीकरिता शेवगा लागवड करण्यासाठी अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. प्रती हेक्टर 7.5 किलो शेवगा (पीकेएम-1) बियाणाची किंमत 6 हजार 750 रूपये व उर्वरित अनुदान 23 हजार 250 रूपये हे दोन टप्प्यांमध्ये वितरीत करण्यात येणार आहे. या योजनेकरिता इच्छुक असणाऱ्या पशुपालक / शेतकऱ्यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती आणि नजीकचा पशुवैद्यकीय दवाखाना यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त पशुसंवर्धन सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

बियाणाचा थेट पशुपालकांना पुरवठा करण्यात येणार असून उर्वरित अनुदानातून जमिनीची मशागत व लागवड, खतांची खरेदी व इतर अनुषंगिक खर्च करावयाचा आहे. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीसाठी शेवगा लागवड करणे (अनुसूचित जाती उपयोजना) या योजनेकरिता प्रती हेक्टर 30 हजार रूपये प्रती लाभार्थी अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत प्रती जिल्हा 15 हेक्टर क्षेत्राकरिता 4 लाख 50 हजार याप्रमाणे एकूण 34 जिल्ह्यांकरीता 1 कोटी 53 लाख निधी वितरीत करण्यात आलेला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.