अमोल मिटकरींच्या 'त्या' वक्तव्यावर अजित पवार भडकले; म्हणाले.
पुणे : विदर्भातील राष्ट्रवादीचे आमदार गेल्या दोन दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. मिटकरी यांनी राष्ट्रवादीच्या परिवार संवाद मेळाव्यात ब्राम्हणांची नक्कल केली त्यावरून राज्यात मोठा वाद सुरु झाला आहे.
अखिल ब्राह्मण महासंघाकडून मिटकरी यांच्या निषेदार्थ पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यलयासमोर आंदोलन करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले. राजकीय व्यक्तींनी तारमत्य ठेवूनच वक्तव्यं केली पाहीजेत असे पवार म्हणाले ते पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.
अजित पवार म्हणाले, ‘माझं नेहमी स्पष्ट मत असतं आणि तुम्हा सर्व मीडियाला माहिती आहे. तुम्ही नेहमी मला असले प्रश्न विचारत असता की याने असं वक्तव्य केलं त्याबद्दल तुमचं मत काय आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त करत असताना कुठल्या समाजाबद्दल, घटकाबद्दल अवमान होणार नाही तसंच नाराजी वाढणार नाही याचं तारतम्य ठेवूनच वक्तव्यं केली पाहिजेत.
दरम्यान, आमदार मिटकरी यांनी राष्ट्रवादीच्या परिवार संवाद मेळव्यात ब्राम्हणांची नक्कल करत काही मंत्रही म्हटले होते. मिटकरी यांच्याकडून ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगत त्यांनी ब्राह्मण समाजाची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र मिटकरी यांनी माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
