Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याने महिला इंजिनिअरचे नग्न फोटो व व्हिडीओ काढून बलात्कार

पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याने महिला इंजिनिअरचे नग्न फोटो व व्हिडीओ काढून बलात्कार


पुणे : पुणे शहरात महिलांवरील अत्याचाऱ्यांच्या घटनामध्ये दिवसागणीक मोठी वाढ होताना दिसून येत आहे. बलात्कारांच्या बातम्या सुद्धा अनेक वेळा बघायला मिळत आहे. त्यामुळे शहरात पोलिसांचा धाक राहीला की नाही असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

मात्र जर कायदाचा रक्षकच असे कृत्य करत असेत तर कोणाकडे न्याय मागायचा असा प्रश्न आता सर्वानांच पडला आहे. दरम्यान शहरात आज एका पोलीस कर्मचाऱ्याने महिलेवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा घटनेमुळे शहरातील महिला खरचं सुरक्षीत आहेत का असा प्रश्न यावरून उपस्थित झाला आहे.

फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून सुरुवातीला आरोपी पोलीसांने महिलेबरोबर मैत्री केली त्यानंतर महिलेवर बलात्कार केला व तिचे नग्न फोटो व व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. विक्रम फडतरे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो पुण्यातील वाहतूक शाखेत कार्यरत आहे. याप्रकरणी एका 30 वर्षीय महिला इंजिनिअरने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार मोशी व आकुर्डीसह वेगवेगळ्या ठिकाणी 15 सप्टेंबर 2021 ते 11 फेब्रुवारी 2022 दरम्यान घडला आहे.

फडतरे यांने सुरवातीला तक्रारदार महिलेला फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. ही महिला विवाहित असून त्या एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. त्यानंतर फडतरे व महिलेमध्ये मैत्री झाली व हे दोघे एकमेकांना भेटू लागले. या दरम्यान फडतरे याने महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. महिलेच्या नकळत त्याने तिचे नग्न फोटो व व्हिडिओ काढले. हे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. शेवटी या सर्व प्रकाराला कंटाळून महिलेने पोलीसात धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.