जैन समाजामुळे दक्षिण भारत जैन सभा मोठी झाली - रावसाहेब पाटील
सांगली दि. २३: दक्षिण भारत जैन सभा ही गेली १२३ वर्षे जैन समाजाची चौफेर प्रगती करीत आहे. सभेमुळे जैन समाजाची धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व कृषी विकास झाला आहे.समाजातील सर्व घटकांच्या सहकार्याने सभा मोठी झाली आहे. रावसाहेब दादांच्या नेतृत्वाखाली सभेने गरुड भरारी घेतली आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सभा पोहचली पाहिजे. कर्नाटक राज्यांप्रमाणे अल्पसंख्याक सवलती महाराष्ट्रात मिळाल्या पाहिजेत.. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. संघटीत व्हा.. एकमेकांना मदत करा. सभेचे शंभरावे अधिवेशन सांगलीत होत आहे. या अधिवेशनाला दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री व डझनभर मंत्री उपस्थित राहणार आहेत. समाजाच्या महत्त्वाच्या समस्या शासनासमोर मांडण्यात येणार आहेत. त्यामुळे मोठय़ा संख्येने उपस्थित राहून समाजाची ताकद दाखवावी व अधिवेशनाला भरीव आर्थिक मदत करावी असे प्रतिपादन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी स्वप्निल आवाडे होते.
प्रारंभी प्रथमाचार्य शांतीसागर महाराज व वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक सुकुमार किणींगे यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
