काळी खण सुशोभीकरणाचे काम गेले अनेक दिवस बंद आहे.
सांगली दिं.२५: काळी खण सुशोभीकरणाचे काम गेले अनेक दिवस बंद आहे. हे काम तातडीने सुरू करावे. पुष्पराज चौक ते आपटा चौकी हा रस्ता एकेरी मार्ग करावा. माधवनगर रोडवरील टीव्हीएस शोरूम समोरील वाहतूक कोंडीवर कायमची उपाय योजना करावी. अशी मागणी अण्णा फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अशोक मासाळे यांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सांगली येथील काळी खण पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी भरीव निधी ही प्राप्त झाला आहे. त्याचे काम दोन महिन्यांपूर्वी सुरू झालं. मात्र गेले अनेक दिवस झाले हे काम पूर्णपणे बंद आहे. हे बंद असलेलं काम तातडीने सुरु करावे, तसेच काळ्या खणीनजिकचा रस्ता अरुंद आहे त्यामुळे या मार्गावर म्हणजेच पुष्पराज चौक ते आपटा चौकी पर्यंतच्या रस्त्यावर एकेरी वाहतूक करावी. या मार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी करावी. तसेच प्रभाग 10 मधील सांगली कॉलेज कॉर्नर ते रेल्वे स्टेशन या रस्त्यावर दोन्ही बाजूला फुटपाथ करावा. सांगली माधवनगर रोडवरील टीव्हीएस शोरूम समोर नेहमी वाहतुकीची कोंडी होते. अनेक दुचाकी वाहने रस्त्यावरच लावलेली असतात. मदनभाऊ पाटील यांच्या स्मारका नजीक अवजड वाहने मोठ्या संख्येने बेकायदेशीरपणे पार्क केली जातात. त्यामुळे या रस्त्यावर वाहन अपघातांचे प्रमाण वाढले आहे.या मार्गावर वाहतुकीची कोंडी कमी करून वाढते अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाय योजना राबवावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक 10 मधील या प्रमुख समस्या बरोबरच स्ट्रीटलाईट व इतर विविध समस्या येत्या आठ दिवसात सोडवाव्यात, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही अशोक मासाळे यांनी या निवेदनात दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.