ट्रॅक्टरमध्ये उतरलेले बॅक्स पुन्हा कंटेनरमध्ये भरले प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी सदुनिची धावपळ, संशयितावर दबावाचा प्रयत्न
सांगली : इस्लामपूर येथील गोवा बनावट दारू प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत. येलूरमधील ज्या बार चालकाने गोवा बनावटीच्या दारूची आडर्र दिली होती. त्याने कंटेनरमधील अनेक बॅक्स ट्रॅक्टरमध्ये उतरून घेतले होते. त्यानंतर संबंधित सदुनिने अंबर दिवा असलेल्या स्कॅपिर्ओतून तिथे अचानक एंट्री मारली. संशयितांकडे पैशांची मागणी केली. ती पूणर् न झाल्याने ट्रॅक्टरमध्ये उतरलेले बॅक्स पुन्हा कंटेनरमध्ये भरले. प्रकरण अंगलट येत असल्याचे दिसताच या सदुनिने त्यावर पडदा टाकण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. यासाठी संशयितावर दबावही टाकला जात असल्याची चर्चा आहे.
यातील एका संशयिताच्या खात्यावर येलूरच्या त्या बार चालकाने एक लाख रूपये भरले होते. महिनाभरापासून त्याला गोव्यातून दारू आणण्यासाठी तगादा लावला होता. यामागे तो सदुनिच होता. संशयिताला दारू येलूर परिसरात आल्याचे माहितीही नव्हते. त्याला रविवारी सकाळी बार चालक आणि त्या सदुनिने एका संशयिताला तेथे बोलावून घेतले. नंतर त्याच्याकडे सदुनिने दहा लाख रूपयांची मागणी केली. यावेळी त्याने वरीष्ठांनाही द्यावे लागतात असे संशयिताला सांगितले.
संशयिताकडून पैसे मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सदुनिने त्याला इस्लामपूर येथे नेले. त्यानंतर त्याने इस्लामपूरच्या प्रभारी अधिकाऱ्याला याची माहिती देण्याआधीच वरीष्ठ अधिकाऱ्यांना वाघ मारल्याच्या आवेषात कारवाईची माहिती दिल्याचीही चर्चा. त्यावेळी वरीष्ठांनी पाठ थोपटल्याने त्या सदुनिला आकाश ठेंगणे झाले होते. याचीही एक्साईजमध्ये जोरदार चर्चा आहे.
या सदुनिने येलूर फाटा परिसरात संशयिताकडे पैशांची मागणी केली. पैसे मिळत नाही असे लक्षात आल्यानंतर त्याने तसेच संबंधित बार चालकाने एका संशयिताला तेथील एका हॅटेलच्या पिछाडीस नेऊन बेदम मार दिला. याबाबत त्याने तक्रार केल्यास बघून घेण्याची धमकीही दिल्याची जोरदार चर्चा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.