Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

व्हिडिओत दिसणारी किरीट सोमय्या यांची 'ती' जखम बनावट?

 व्हिडिओत दिसणारी किरीट सोमय्या यांची 'ती' जखम बनावट?


मुंबई :  नवनीत राणा आणि रवी राणा यांना शनिवारी रात्री खार पोलीस स्टेशनमध्ये भेटायला गेलेल्या भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर जमावाने दगडफेक केली. या हल्यात किरीट सोमय्या यांच्या गाडीच्या काचेला भेदून एक दगड गाडीतून आत घुसला. यात किरीट सोमय्या जखमी झाले. त्यांच्या हनुवटीतून रक्त येऊ लागले होते.

दरम्यान, आता प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले असून किरीट सोमय्या यांना झालेली ही जखम बनावट असल्याची शंका पोलिसांकडून उपस्थित होत आहे. हल्ल्यानंतर समोर आलेल्या दृश्यांमध्ये किरीट सोमय्या यांना हनुवाटीतून रक्त येत असल्याचं दिसून आलं होतं.

दरम्यान, ही जखम बनावट होती की काय? असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे. मुंबई पोलीस आणि गृहखात्याकडून या हल्ल्याची सत्यता पडताळण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीही तपासले जाणार असल्याचे सांगितलं जात आहे. दरम्यान, आता या तपासातून नवीन कोणता खुलासा होणार हे पाहणं महत्वाचं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.