विषय अतिरिक्त सुरक्षा अनामत वसुलीबाबत ...
विद्युत ग्राहकांच्या नियमित विद्युत बीला सोबत अतिरिक्त सुरक्षा अनामत रकमेची मागणी करणारी स्वतंत्र देयके देण्यात आली आहेत व देण्यात येत आहेत.
सदरच्या अतिरिक्त बिलांच्या वसुलीची मुदत 8 मे ते 22 मे अशी नमूद करण्यात आली आहेत. याबाबत विद्युत ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष व विरोध आहे. ही बिले कोणत्याही परिस्थितीमध्ये अदा न करण्याचा निर्णय कृती समितीतील सर्व राजकीय पक्ष व संघटनांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. या बाबी मध्ये खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आले आहेत
(01)
सदरची अतिरिक्त सुरक्षा अनामतची मागणी ही पूर्णपणे बेकायदेशीर असून ग्राहकांना विश्वासात न घेता करण्यात आली आहे. सदर मागणीची ही बिले त्वरित रद्द करण्यात येऊन त्याप्रमाणे निवेदन हे वृत्तपत्रे व समाज माध्यमावर देण्यात यावे.
(02)
वरील अतिरिक्त मागणी बीले रद्द न केल्यास व तसे प्रसिद्धीपत्रक न पाठवल्यास वितरण कंपनीच्या बेकायदेशीर निर्णयास संबंधित विद्युत नियामक आयोग / उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल. न्यायालयाच्या निर्णय येई पर्यंत कोणताही ग्राहक ही सुरक्षा अनामत बिले अदा करणार नाही. वरील मागणी तातडीने पूर्ण करण्यात यावी व वीज ग्राहक / वितरण कंपनी संबंध सौहार्दपूर्ण ठेवण्यास मदत करावी ही विनंती.
*सर्वपक्षीय विद्युत ग्राहक कृती समिती, सांगली.*
मा.आ नितीनराजे शिंदे, पै पृथ्वीराज पवार, महेश खराडे कॉ. उमेश देशमुख, सतीश साखळकर, अमर पडळकर, आश्रफ वांकर, प्रशांत भोसले, विकास मगदूम, डॉ संजय पाटील, कामरान सय्यद, लालू मिस्त्री, तोहीद शेख, अविनाश जाधव, राजकुमार राठोड, रेखा पाटील, दीपक माने, चंद्रकांत सूर्यवंशी,कॉ.रमेश सहस्रबुद्धे,
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.