Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भिंतीत मिळाले 10 कोटींचे बंडल व 19 किलो चांदीच्या विटा; महाराष्ट्र जीएसटी विभागाची कारवाई.

 भिंतीत मिळाले 10 कोटींचे बंडल व 19 किलो चांदीच्या विटा; महाराष्ट्र जीएसटी विभागाची कारवाई.


मुंबई दि. 25 एप्रिल : मुंबईत झवेरी बाजारातील चामुंडा बुलियन ज्वेलर्सच्या कार्यालयातील एका भिंतीत लपवून ठेवलेल्या तब्बल 10 कोटी रुपयांच्या करकरीत नोटा आणि 19 किलो चांदीच्या विटा राज्य जीएसटी विभागाने एका कारवाईत जप्त केल्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात सध्या ईडी, एनसीबीच्या धाडी चर्चेच्या ठरत आहेत. यातच राज्याच्या जीएसटी विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या धडक कारवाईमुळे सराफा व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जीएसटी विभागाची अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईत जीएसटी विभागाला चक्क भिंतीत लपवलेले घबाड सापडले आहे. या कारवाईत जीएसटी चोरी उघड झाली आहे.

संशयानंतर हाती लागले घबाड ....

मुंबई मधील नामांकित झवेरी बाजारात चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल 2019-20 मध्ये 22 कोटी 83 लाख रुपयांवरून 2020 21 मध्ये 665 कोटी रुपये आणि 2022 या वर्षामध्ये 1 हजार 764 कोटी रुपयांवर गेली. सदरील कंपनीचा आर्थिक प्रगतीचा चढता आलेख पाहून राज्य जीएसटी विभागाला संशय आला.

जीएसटी विभागाने तपास सुरू केला असता या कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणीच नसल्याचे समोर आले. यानंतर जीएसटी विभागाने कंपनीच्या कार्यालयांची तपासणी केली, पण जीएसटी अधिकाऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. पण तरीही तपास सुरू ठेवला तेव्हा कंपनीच्या एका 35 चौरस मीटर जागेतील एका भिंतीत लपवून ठेवलेली 9 कोटी 79 लाख रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटा तसेच 13 लाख रुपयांच्या चांदीच्या विटा सापडल्या तेव्हा जीएसटी विभागाचे  अधिकारीही चक्रावून गेले. सदरील कंपनीचे कार्यालय जीएसटी विभागाकडून सील करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.