Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित कृष्णामाई जत्रेचे आयोजन : आज भव्य उद्गाटन

सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित कृष्णामाई जत्रेचे आयोजन : आज भव्य उद्गाटन



: सुप्रसिद्ध सिनेअभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांची प्रमुख उपस्थिती:  विविध स्पर्धा, करमणुक, फुड फेस्टिवल, शॉपींग व इलेक्ट्रॉनिक्स फेअरचे आयोजन


सांगली : मिरज कुपवाड महापालिका आयोजित व रिसोर्सेस यांच्या सहकार्याने या वर्षी प्रथमच सांगलीच्या सांस्कृतिक, सामाजिक परंपरेचे दर्शन देणाऱ्या कृष्णामाई जत्रेचे आज सायं.५ वा भव्य उद्घाटन. या उद्घाटनासाठी सिद्धार्थ चांदेकर ( सुप्रसिद्ध सिनेअभिनेता झिम्मा, गुलाबजाम, क्लासमेट फेम ) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

      यावेळी महापौर सुर्यवंशी आणि आयुक्त कापडणीस म्हणाले की, दि. २१ ते २४ एप्रिल २०२२ रोजी माई घाट, आयर्विन पुलाजवळ, सांगली येथे हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवामध्ये २१ एप्रिल रोजी उद्घाटनादिवशी महानगरपालिका कर्मचारी, पदाधिकारी यांची बाईक रॅली होणार आहे. तसेच ग्रुप डान्स शो, हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धा होणार आहेत. लहान मुलांसाठी जादूचे प्रयोग, मर्दानी खेळ, मल्लखांब असणार आहे. तसेच आर्ट फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे. दि. २२ एप्रिल रोजी झी मराठी वाहिनीवरील उत्सव नात्यांचा या मधील कलाकार अमृता धोंगडे ( मिसेस मुख्यमंत्री ), प्रल्हाद कुडतरकर ( लेखक - रात्रीस खेळ चाले ), काजल काटे ( माझी तुझी रेशीम गाठ मधील शेफाली ), वैभव चव्हाण , श्वेता खरात मन झालं बाजींद मधील राया आणि कृष्णा ), नुपूर पैठणकर ( शो बाजी फेम ), योगेश शिरसाट, अंकुश वाढावे, स्नेहल शिवम ( चला हवा येऊ द्या फफेम ) पलाक्षी दीक्षित, सारंग भालके, चैतन्य कुलकर्णी (सा रे ग म पा फेम ) भेट देणार आहेत. तसेच क्यूब शो, लेझीम स्पर्धा, झुंबा आणि टायलेन्ट शो होणार आहे. दि. २३ एप्रिल रोजी सांगली आयडॉल, उखाणा स्पर्धा, खास महिलांसाठी लावणी शो होणार आहे.

फॅशन शो, दीप उत्सव, संस्कार भारती रांगोळी , बिअर्ड शो, होडी शर्यत होणार आहे. दि. २४ एप्रिल २०२२ रोजी मनपा आयडॉल हा कर्यक्रम होणार आहे तसेच महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा विविध कला गुण दर्शन कार्यक्रम होणार आहे. सोलो, ड्युएट आणि ग्रुप डान्स स्पर्धा, पोहण्याच्या स्पर्धा तसेच लेझर शो, डॉग शो याचे आयोजन केले आहे. सर्व स्पर्धाचे बक्षीस स्पॉन्सर चितळे डेअरी आहेत.

कृष्णामाईच्या जत्रेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कंझ्युमर, होम अप्लायन्सेस अशा सर्व वस्तू एकाच छताखाली मिळणार आहेत. कृष्णामाई जत्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल असणार आहेत यात महाराष्ट्रीयन, गुजराती, पंजाबी, कोल्हापुरी थाळी, भेळ, पिझ्झा, वडापाव, लस्सी, आईस्क्रीम च्या विविध व्हरायटी असणार आहेत. याचा आनंद सांगलीकरांना फुड स्टॉल्स मध्ये घेता येईल. या उन्हाळी सुट्टी मध्ये खास लहान मुलांसाठी अम्युझमेंट व वॉटर पार्क ची सुद्धा व्यवस्था केली आहे भव्य पाळणे, ब्रेक डान्स, जंपिंग अशी आधुनिक खेळणी खास लहान मुलांच्याकरिता ठेवण्यात येणार आहेत. कृष्णामाईची जत्रा यासाठी लाईट आणि अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था शरद शाह यांच्याकडून करण्यात येणार आहे . संस्कार भारती रांगोळी यांचे तर्फे एका तासात मूर्ती बनवून मिळणार आहे. खास आकर्षण माई घाटावर लेझर शो होणार तसेच बनाना बोट, कायाकिंग तसेच अॅडव्हेंचर स्पोर्ट वॉटर स्पोर्ट होणार आहे.

या महोत्सवासाठी सांगलीतील रिसोर्सेस ही एक अग्रगण्य इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. जी गेली २६ वर्षे कंझ्युमर फेअर पासून सुरूवात करून आंतरराज्यीय प्रदर्शने व आंतरराष्ट्रीय दर्जा टिकवून फार मोठी झेप या क्षेत्रात घेतली आहे. आपल्या तज्ञ व्यवस्थापनाद्वारे उत्तम सेवा, वाजवी दर, सर्वोच्च दर्जा या समीकरणातून सिद्ध झालेली ही कंपनी...

यांच्या कडे नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तरी सर्व सांगलीकरांनी या कृष्णामाई च्या जत्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर मा, दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी स्थायी सभापती निरंजन आवटी, गटनेते विनायक सिंहासने, विरोधीपक्षनेते संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुदिन बागवान, उपायुक्त राहुल रोकडे, चंद्रकांत आडके, रिसोर्सेसचे राजेश शहा आदी उपस्थित होते. कृष्णमाईची जत्रा यासाठी होणाऱ्या विविध स्पर्धेच्या प्रवेशा साठी संपर्क ०२३३-२६२२०८० या नंबरवर संपर्क साधावा


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.