स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी 27 एप्रिलला मार्गदर्शन वेबीनार
सांगली दि. 20 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी बुधवार, दि. 27 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक युवक व युवतींनी meet.google.com/rscewsv-nhc या लिंकवर विहीत वेळेपूर्वी 10 मिनिटे अगोदर वेबीनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.
या वेबीनारमध्ये बँक प्रकरणाविषयी विविध शासकीय योजनांची माहिती या विषयावर वित्तीय साक्षरता केंद्राचे समुपदेशक लक्ष्मीकांत कट्टी हे मार्गदर्शन करणार असून वेबीनारमध्ये सहायक आयुक्त ज. बा. करीम यांचा सहभाग आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
.jpeg)