दुसरे महायुध्द अनुदान धारकांना हयातीचे दाखले ३१ मे पर्यंत जमा करण्याचे आवाहन
सांगली दि. 20 : दुसरे महायुध्द अनुदान धारक माजी सैनिक/विधवा यांना प्रत्येक वर्षी माहे मे व नोव्हेंबर या महिन्यात हयातीलचे दाखले बँकेव्दारे अथवा स्वत: जिल्हा सैनिक कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. तरी संबंधितांनी स्थानिक ग्रामसेवक/तलाठी/शासकीय अधिकारी/शासकीय वैद्यकिय अधिकारी/बँक मॅनेंजर यांच्याकडून हयातीचे दाखले घेवून आपल्या बँकेच्या पासबुकाचे पहिले व शेवटच्या प्रिंट केलेल्या पानांची व माजी सैनिक/विधवा ओळखपत्राची छायांकित प्रतीसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली येथे दि. 31 मे 2022 पर्यंत जमा करावेत, असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
अपरिहार्य परिस्थितीत लाभार्थीच्या नातेवाईकांकडून सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याशी व्हीडीओ कॉलव्दारे लाभार्थी हयात असल्याची पडताळणी करण्याची सोय ठेवण्यात आलेली आहे. हयातीचा दाखला वेळेत सादर न केल्यास माहे जून 2022 पासून अनुदान बंद करण्यात येईल याची लाभार्थींनी नोंद घ्यावी, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
