इस्लामपूर संशयित पलायनप्रकरणी एक्साईजच्या अधिकाऱ्यासह तिघांना नोटीस निलंबन कारवाईसाठी टाळाटाळीसह एका जवानाला क्लीन चिट दिल्याची चर्चा
सांगली: इस्लामपूर येथे बनावट दारूप्रकरणी अटक केलेल्या संशयिताने अधिकारी, कमर्चाऱ्यांना कोंडून घालून पलायन केले होते. सोमवारी हा प्रकार घडला होता. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. या घटनेची एक्साईजच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते. त्यावर बुधवारी याप्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्यासह दोन जवानांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे एक्साईजच्या सांगली जिल्ह्याच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांनी सांगली दपर्णशी बोलताना दिली. दरम्यान त्याबाबतचा अहवालही वरीष्ठ अधिकाऱ्यांना पाठवल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान बनावट दारू प्रकरणातील संशयिताच्या पलायन प्रकरणातील दोषींवर कारवाई टाळण्यासाठी काहींचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. शिवाय अधिकाऱ्यांचा हरकाम्या म्हणून काम करणाऱ्या एका जवानाला या कारवाईत क्लीन चीट दिल्याची चचार्ही एक्साईजच्या वतुर्ळात चांगलीच रंगली आहे. गोव्याहून पुणे-बंगळुरू रस्त्यावरून गोवा बनावटीची दारू घेऊन एक कंटेनर येलूरच्या दिशेने येत होता. याची माहिती मिळाल्यानंतर एक्साईजच्या इस्लामपूर येथील अधिकारी, कमर्चाऱ्यांनी एक कार आणि कंटेनरची तपासणी केली. त्यावेळी कंटेनरमध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली. यानंतर शंकर पवार, लक्ष्मण भोसले यांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांना एक्साईच्या कायार्लयातच बसवण्यात आले होते. सोमवारी सकाळी शंकर पवार याने प्रातःविधीसाठी जाण्याचे कारण सांगितले. त्याला दोन जवान घेऊन जात असताना पवार याने त्यांच्या हाताला हिसडा मारून पलायन केले. पळून जाताना त्याने एक्साईजच्या कायार्लयालाच बाहेरून कडी लावली. हा प्रकार घडल्यानंतर पवार पळून गेल्याची फियार्द पोलिस ठाण्यात देण्यात आली.
बनावट दारूतील संशयिताला पळून जाण्यासाठी पथकातीलच एका जवानाने मदत केल्याची चर्चा एक्साईजमध्ये आहे. शिवाय संबंधित अधिकारी आणि ते दोन जवान यांनाच केवळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ठरावीक अधिकाऱ्यांच्या हरकाम्या जवानाला मात्र यात क्लीन चीट दिल्याचीही जोरदार चर्चा आहे.दरम्यान पोलिस विभागात संशयितांनी पलायन केल्यानंतर संबंधितांवर तातडीने निलंबनाची कारवाई केली जाते. मात्र एक्साईजमध्ये अशी कारवाई का केली जात नाही असा प्रश्नही नागरिकांकडून विचारला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
