Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिकेने सुरू केलेली कृष्णामाईची जत्रा भविष्यात जागतिक जत्रा बनेल : अभिनेते सिद्धार्थ चांदेकर यांचे उदगार कृष्णामाई जत्रेचे चांदेकर यांच्याहस्ते शुभारंभ

महापालिकेने सुरू केलेली कृष्णामाईची जत्रा भविष्यात जागतिक जत्रा बनेल : अभिनेते सिद्धार्थ चांदेकर यांचे उदगार  कृष्णामाई जत्रेचे चांदेकर यांच्याहस्ते शुभारंभ 


कृष्णामाईच्या जत्रेसाठी माई घाटावर सांगलीकर जनतेची गर्दी महापौर, आयुक्तांसह पदाधिकारी नगरसेवकांची उपस्थिती


सांगली महापालिकेने सुरू केलेली कृष्णामाईची जत्रा भविष्यात जागतिक जत्रा बनेल असे गौरवोद्गार झिम्मा फेम अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी काढले आहेत.  चार दिवस चालणाऱ्या कृष्णामाई जत्रेचा अभिनेते सिद्धार्थ चांदेकर यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

यावेळी कृष्णामाईच्या जत्रेसाठी माई घाटावर संगलीकरांची तोबा गर्दी केली होती. महापौर दिग्विजय सुर्यवंशी, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, स्थायी सभापती निरंजन आवटी, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, गटनेते विनायक सिंहासने यांच्यासह मनपा नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी  सिद्धार्थ चांदेकर यांच्याहस्ते हवेत फुगे सोडत कृष्णामाईच्या जत्रेचे उदघाटन करण्यात आले. 

पुढील चार दिवस कृष्णा नदीच्या तीरावर सुरू राहणाऱ्या कृष्णामाईच्या जत्रेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबर अनेक लोककला तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. यावेळी बोलताना सिद्धार्थ चांदेकर यांनी कृष्णामाईच्या जत्रेच्या नियोजनाबाबत कौतुक केले. तसेच प्रत्येकवर्षी कृष्णामाईच्या जत्रेला नक्की येईन अशी ग्वाही दिली. 

    यावेळी बोलताना आयुक्त कापडणीस यांनी कृष्णामाईची जत्रा आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला. तसेच कोव्हिडं परिस्थितीमुळे नागरिकांसमोर कोणताही सांस्कृतिक पर्याय नव्हता मात्र या निमित्ताने नागरिकांना चार दिवस भरगच्च सांस्कृतिक मेजवानी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या चार दिवसात नागरिकांनाच्या मनोरंजनात कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही आयुक्त कापडणीस यांनी दिली.

    यावेळी बोलताना महापौर दिग्विजय सुर्यवंशी म्हणाले की नागरिकांना कोणताही मुक्त पर्याय नव्हता. त्यामुळे नागरिकांना एक मोकळीक मिळावी, बालगोपाळानाना मनसोक्त आनंद घेता यावा यासाठी आयुक्त कापडणीस आणि टीमकडून कृष्णामाई जत्रेचा एक प्रयत्न यशस्वी करण्यात आला आहे. ही जत्रा भविष्यात कायम महापालिका राबवले असा विश्वासही महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी व्यक्त केला. 

कार्यक्रमास नगरसेविका भारती दिगडे, उर्मिला बेलवलकर , नसीम शेख , नगरसेवक राजेंद्र कुंभार यांच्यासह महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे, चंद्रकांत आडके, शांतिनिकेतन लोक विद्यापीठाचे प्रमुख गौतम पाटील, ब्रँड आंबेसिडर अजितकुमार कोष्टी , चितळे समूहाच्या सौ अनघा चितळे आदीं उपस्थित होते. यावेळी महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केली. आभार उपायुक्त राहुल रोकडे यांनी मानले. सूत्रसंचालन राणी यादव आणि प्रा. अभ्यंकर यांनी केले. संयोजन रिसोर्सचे राजेश शहा आणि शरद शहा टीमने केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.