Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गोवा बनावटीची दारू मागवणारा नामा निराळा दारू मागवण्यास भाग पाडणारा जवान बिनधास्त, इस्लामपूर पलायनातील संशयित सापडला

गोवा बनावटीची दारू मागवणारा नामा निराळा दारू मागवण्यास भाग पाडणारा जवान बिनधास्त, इस्लामपूर पलायनातील संशयित सापडला


सांगली: इस्लामपूर येथील गोवा बनावट दारू प्रकरणातील पलायन केलेल्या संशयितास गुरुवारी पुण्यातून ताब्यात घेण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान येलूर येथील एका बार चालकाला गोवा बनावट दारूची आडर्र देऊन कारवाईचा घाट घालणारा जवान अजूनही बिनधास्त आहे. एक्साईजच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित बार चालकाकडे कसून चौकशी केल्यास त्या जवानाचे पितळ उघडे पडणार आहे. मात्र जिल्ह्यातील काही ठराविक अधिकाऱ्यांचा हरकाम्या म्हणून काम करत असल्यानेच त्या जवानाला क्लीन चीट दिल्याची चचार् एक्साईजमध्ये चांगलीच रंगली आहे. 

गोव्याहून दारू आणणारा कंटेनर येलूरजवळ रविवारी पकडण्यात आला होता. त्यावेळी एक्साईजच्या इस्लामपूर येथील पथकाने दोघांना ताब्यातही घेतले होते. शंकर पवार, लक्ष्मण भोसले अशी त्यांची नावे आहेत. मात्र सोमवारी सकाळी पवार याने प्रातःविधीचा बहाणा करून पलायन केले होते. त्यावेळी त्याने एक्साईजच्या अधिकाऱ्यांना कोंडून कायार्लयाला बाहेरून कडीही लावली होती. या घटनेने राज्यातील एक्साईजच्या वतुर्ळात चांगलीच खळबळ उडाली होती. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते. 

त्यानंतर या प्रकरणातील संबंधित अधिकारी आणि दोन जवानांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. मात्र त्यांच्यावर कोणती कारवाई झाली याबाबतचा तपशील मिळू शकला नाही. एक्साईजच्या सांगलीच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्याशी संपकर् साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. 

दरम्यान विशिष्ठ अधिकाऱ्यांचा हरकाम्या म्हणून काम करणाऱ्या जवानानेच कारवाई दाखवण्यासाठी येलूर येथील एका बार चालकाला हाताशी धऱून हा स्टंट केल्याचीही जोरदार चर्चा आहे. त्या बार चालकाकडे चौकशी केल्यानंतर हरकाम्या जवानाचे बिंग फुटणार आहे. त्यात अधिकाऱ्यांची नावे स्पष्ट होणार असल्यानेच त्याला क्लीन चीट दिल्याचीही चर्चा एक्साईजमध्ये रंगली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.