Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी उपअभिकर्ता संस्थांमार्फत शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यास मंजुरी

भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी उपअभिकर्ता संस्थांमार्फत शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यास मंजुरी


सांगली दि. 18 :
रब्बी पणन हंगाम 2021-22 मध्ये भरडधान्य (मका व ज्वारी) खरेदी केंद्र सुरू करण्याच्या अनुषंगाने खरेदी सुरू होण्याअगोदरच म्हणजेच 11 एप्रिल 2022 ते 30 एप्रिल 2022 पूर्वी NeML च्या वेब पोर्टलवर सर्व शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याच्या सूचना शासनामार्फत प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव, जत, विटा व आटपाडी येथे उपअभिकर्ता संस्थांमार्फत ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंजूरी दिली आहे.

भरडधान्य (मका व ज्वारी) खरेदी केंद्राचे ठिकाण व कंसात उपअभिकर्ता संस्थेचे नाव पुढीलप्रमाणे.  तासगाव (ॲड. आर. आर. पाटील शेतकरी सहकारी संघ तासगाव), जत (विष्णू आण्णा पाटील सहकारी खरेदी विक्री संघ, सांगली-जत), ‍विटा (खानापूर तालुका खरेदी विक्री संघ ‍विटा), आटपाडी (कृषि उत्पन्न बाजार समिती आटपाडी). नोंदणी प्रक्रिया दि. 30 एप्रिल पर्यंत उपअभिकर्ता संस्थामार्फत केली जाईल. नोंदणी करतेवेळी सर्व शेतकऱ्यांनी सादर केलेले बँक खाते सुरू असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. चौकशी व अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय सांगली (0233-2670820), जिल्हा मार्केटींग अधिकारी सांगली (8108182941), ॲड. आर. आर. पाटील शेतकरी सहकारी संघ तासगाव (9623530717), कृषि उत्पन्न बाजार समिती आटपाडी (9421115628), विष्णू आण्णा पाटील सहकारी खरेदी विक्री संघ सांगली-जत (9881755993), खानापूर तालुका खरेदी विक्री संघ विटा (9850011374).


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.