Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आपण त्या महिलेला तीन लाख रुपये आणि एक महागडा मोबाईल पाठवला होता; धनंजय मुंडेंची कबुली

 आपण त्या महिलेला तीन लाख रुपये आणि एक महागडा मोबाईल पाठवला होता; धनंजय मुंडेंची कबुली


मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे करुणा मुंडे प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अनेक दिवस हे प्रकरण राज्यात खूप चर्चेत होत. तसेच या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या गंभीर आरोप देखील झाले होते. यानंतर आता पुन्हा एक नवीन प्रकरण समोर आलं आहे. तसेच या प्रकरणाने राज्यात पुन्हा खळबळ उडाली आहे.

यावेळी धनजंय मुंडे यांच्याकडे एका महिलेने पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास तुमच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करेन आणि तुमची सोशल मीडियावर बदनामी करेन, अशी धमकीही या महिलेने धनजंय मुंडे यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांनी संबंधित महिलेच्या विरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीत धनजंय मुंडे यांनी आपण या महिलेला ओळखत असल्याचे नमूद केले आहे. तसेच आपण या महिलेला एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून तीन लाख रुपये दिले. याशिवाय, एक महागडा मोबाईलही कुरिअरच्या माध्यमातून पाठवला होता, असेही धनजंय मुंडे यांनी सांगितले आहे.तसेच यानंतर आता या प्रकरणात पुढे कोणत्या गोष्टी समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.